IPL २०२३ साठी आज खेळाडूंचा मिनी लिलाव

२३ डिसेंबर २०२२


क्रिकेट जगतातील सर्वात प्रसिद्ध लीग अर्थात इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी आज २३ डिसेंबर रोजी कोची येथे लिलाव पार पडणार आहे.

आयपीएल २०२३ च्या मिनी लिलावात ४०५ खेळाडू आपले नशीब आजमावनार आहेत. १० संघांमध्ये एकूण ८७ जागा रिक्त आहेत. उर्वरित रकमेनुसार सर्व फ्रँचायझी खेळाडूंची खरेदी करतील. यातील ३० स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी आहेत. म्हणजेच लिलावात जास्तीत जास्त ३० परदेशी खेळाडू विकले जाऊ शकतात. त्यांच्याकडे असलेल्या रकमेनुसार खेळाडूंना खरेदी केले जाईल. जास्तीत जास्त ८७ खेळाडूंवरच बोली लावली जाईल. अशा परिस्थितीत सर्व संघ आपल्या गरजेनुसार स्टार खेळाडूंवर बोली लावतील. यंदाच्या लिलावात कोणत्या देशाचे किती खेळाडू सहभागी होत आहेत ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

यंदा या लिलावासाठी १५ देशांतील ९९१ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातील १४ देशांतील ४०५ खेळाडू बोलीत सहभागी होणार आहेत. भारतातील सर्वाधिक ७१४ खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यापैकी २७३ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. तर ऑस्ट्रेलियाने ५७, दक्षिण आफ्रिकेने ५२, वेस्ट इंडिजचे ३३, इंग्लंडचे ३१, न्यूझीलंड २७, श्रीलंका २३, अफगाणिस्तान १४, आयर्लंड १४, नेदरलँड सात, बांगलादेश आणि झिम्बाब्वे ६-६, नामिबिया पाच आणि स्कॉटलंडच्या दोन खेळाडूंनी नोंदणी केली होती.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *