नववर्ष आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांच्या सूचना

प्रतिनिधी : सुहास मातोंडकर

दि.२२ डिसेंबर २०२२

लोणावळा


लोणावळा : नववर्ष आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर पवनानगर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी परिसरातील तंबू पर्यटन व्यावसायिकांची बैठक घेऊन अनुचित प्रकार घडल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा देत सुरक्षेबाबत विविध सूचना त्यांना केल्या आहेत.या बैठकीत लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी पर्यटन व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.

तंबूनिवासात कोणतेही अवैध प्रकार घडता कामा नयेत. मुली, महिलांची छेडछाड होता कामा नये यासाठी विशेष काळजी घ्यावी. तंबूनिवासाच्या परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याची खात्री करावी. येणाऱ्या पर्यटकांची पूर्ण माहिती घ्यावी. सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. येणार्‍या पर्यटकांची तपासणी करण्यासाठी मेटल डिटेक्टरची व्यवस्था करावी, अतितातडीच्या वेळी प्रथमोपचार सुविधा असावी, विद्युत रोषणाईच्यावेळी विद्युत निरीक्षक यांच्याकडून तपासणी करावी, पर्यटकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी अशा सूचना यावेळी पोलिसांनी केल्या.

यावेळी पोलीस हवालदार निवेश कवडे, संतोष शेळके, नितिन कदम, रफीक शेख, अंकुश नायकुडे, पोलीस नाईक दत्ता शिंदे, पोलीस काॅन्स्टेबल सागर धनवे, सुभाष शिंदे होमगार्ड वाळूंज यांच्यासह तंबू पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *