गुजरातमध्ये आमचा खऱ्या अर्थाने विजय आणि भाजपाची हार – सुषमा अंधारे

०९ डिसेंबर २०२२


गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने सत्ता कायम राखत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भाजपच्या विजयानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, गुजरातच्या जनतेला महाराष्ट्रातून एवढे सगळे उद्योग गिफ्ट दिलेले आहेत. भले ते कसेही कुट कारस्थान करून का होईना. महाराष्ट्रातील उद्योग जर गुजरातच्या जनतेला खुश करण्यासाठी उपयोगी पडले असतील तर चांगली गोष्ट आहे. मी ही आठवण करून दिली पाहिजे की क्रिकेटर रवींद्र जडेजा यांनी ट्विटरवर जो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ शेअर केला होता. तो या गोष्टीचा द्योतक आहे की आजही गुजरातला निवडणुका जिंकण्यासाठी वंदनीय बाळासाहेबांचा व्हिडिओ वापरावा लागतो. त्यांच नाव वापरावा लागतं यातच, आमचा खऱ्या अर्थाने विजय आहे, आणि यातच भाजपाची हार सुद्धा आहे, असंही अंधारे यांनी नमूद केलं.

संजय राऊत यांनी चिथावणी खोर वक्तव्य करू नये असं, बावनकुळे यांनी म्हटलं. त्यावर अंधारे म्हणाल्या, बावनकुळे यांनी असं नाही म्हटलं तर त्यांच प्रदेशाध्यक्ष पद जाऊ सुद्धा शकत. यावरून हे सिद्ध होते की भाजपा सुडाचं राजकारण करत आहे. तुम्ही काहीही बोललात की आम्ही तुमच्यावर खोट्या केसेस दाखल करू शकतो. जसे कल्याणमध्ये अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. या पद्धतीचे राजकारण ते करू शकतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याचं आम्हाला फार काही वाटत नाही. आम्ही मानसिकदृष्ट्या तयार आहोत, असंही त्या म्हणाल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *