औद्योगिक सांडपाण्यावर होणार प्रक्रिया

०६ डिसेंबर २०२२

पिंपरी


महापालिका , मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज , महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यावतीने संयुक्त औद्योगिक सांडपाणी प्रक्रीया संयंत्रणा ( सीईटीपी ) प्रकल्प उभारला जात आहे . त्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल ( एसपीव्ही ) कंपनी तयार केली आहे . त्याद्वारे प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे . या प्रकल्पाची क्षमता भविष्यात वाढविण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करावे , अशी सूचना महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी केली . औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी संयुक्त औद्योगिक सांडपाणी प्रक्रीया संयंत्रणा ( सीईटीपी ) उभारणे , घनकचरा व्यवस्थापन , औद्योगिक परिसरातील सुरक्षा व्यवस्था , तळवडे भागातील रेडझोन संदर्भातील महापालिकेशी संबंधित असणाऱ्या बाबी , विविध सुविधांसाठी विकास आवश्यक औद्योगिक महामंडळाच्या जागेचे विषय आणि साहित्य पुनर्वापर सुविधा आदी विषयांबाबत महापालिका , मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज , महाराष्ट्र इन्व्हारो पॉवर लिमिटेड , पिंपरी – चिंचवड लघुउद्योजक असोसिएशन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी , पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी झाली. त्यात प्रशासक सिंह बोलत होते.

यावेळी प्रक्रियाबाबत सांडपाण्यावरील विविध अंगाने चर्चा करण्यात आली . अतिरिक्त प्रदीप आयुक्त जांभळे , जितेंद्र वाघ , शहर अभियंता मकरंद निकम , सहशहर अभियंता रामदास तांबे , प्रमोद ओंभासे , उपआयुक्त अजय चारठाणकर , आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे , उपअभियंता हरविंदर बन्सल , योगेश आल्हाट , मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे पिंपरी चिंचवड विभागाचे अध्यक्ष दीपक करंदीकर , पराग कुलकर्णी , सुधान्वा कोपर्डेकर , प्रलोष गुप्ता , लघुउद्योजक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप बेलसरे , प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे , उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबणीस , सीईटीपी फाउंडेशनचे मिलिंद वराडकर , संजीव शहा , प्रोक्योरमेंट कन्सल्टंट नवनीत झा , महाराष्ट्र इन्व्हारो पॉवर लिमिटेडचे उपमहाप्रबंधक राकेश मिश्रा , अमित बजाज आदी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *