संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना खोचक सल्ला

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१६ नोव्हेंबर २०२२


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारपासून विविध ठिकाणी भेट देणार आहेत. यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य असलेल्या राजगृहला ते भेट देणार आहेत. त्यानंतर राजभवनवरील रोजगार मेळावा आणि नंतर इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा ते घेणार आहेत. मात्र, संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापौर बंगला परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा आढावाही घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला भेट देणार असल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी खोचक सल्ला दिला आहे. बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. कुणीही असतील. मी कुणाचं व्यक्तीगत नाव घेत नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.काय होतंय, काय होऊ घातलंय हे सगळं बाळासाहेब ठाकरे पाहात आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठित जे लोक खंजीर खुपसतात, त्यांचं कधी भलं झालेलं नाही हा इतिहास आहे. सगळेच बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊ शकतात, पण चांगल्या मनाने जा, असंही संजय राऊत म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *