मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ नोव्हेंबर २०२२


मंत्रिमंडळनिर्णय –

१. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा या योजनेत घ्यावयाची कामे, अंमलबजावणी व इतर निकष सुधारित करण्याबाबत मंत्री मंडळास शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.या समितीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री तर सदस्य म्हणून वन व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच बंदरे व खनिकर्म मंत्री असतील.

२.राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनच्या चौथ्या टप्प्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ६ वर्षांपर्यंतच्या बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी २००५ साली स्थापन झालेल्या मिशनला दुसरा टप्पा (सन २०११-१५) तिसरा टप्पा (सन २०१६-२०) अशी मुदतवाढ.

३. मरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील सापन मध्यम प्रकल्पाच्या ४९५.२९ कोटी रुपये किमतीच्या कामास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पाद्वारे ३५ गावांतील एकूण ६१३४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *