अंधेरीची निवडणूक ही मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाची आहे – चंद्रशेखर बावनकुळे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ ऑक्टोबर २०२२


राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवार अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांच्याविरोधात भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली असून ही लढाई भाजपा विरुद्ध ठाकरे गट असणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली.

बावनकुळे म्हणाले, मुरजी पटेल यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. मला विश्वास आहे की ५१ टक्के मतं घेऊन, मुरजी पटेल हे १०० टक्के विजयी होतील. ही निवडणूक १०० टक्के महत्त्वाचीच असणार आहे. कोणतीही निवडणूक ही महत्त्वाचीच असते. पण अंधेरीची निवडणूक ही मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाची आहे. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून घडलेल्या घडामोडींबाबत बोलताना बावनकुळेंनी मला वाटतं राजीनामा स्वीकारणे अथवा न स्वीकारणे हा महानगर पालिकेचा अधिकार आहे. न्यायालयाने आपला न्यायालयीन अधिकार वापरला. भाजपा म्हणून आमचा कुठेही यामध्ये संबंध नाही. जे उमेदवार देतील त्याच्याविरोधात आम्हाला लढायचं आहे. त्यामळे कोणीही उमेदवार आला तरी आमची लढाई पक्की आहे. अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *