नागापूर येथील बंद पडलेले सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालू करण्याबाबत ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉइज फेडरेशनच्या वतीने निवेदन

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१० मार्च २०२२

घोडेगाव


आदिवासी विभागातील तरुणांना पोलिस दलात भरती होण्या करीता, आंबेगाव तालुक्यात ,सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालू करण्याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. हे प्रशिक्षण केंद्र साल तालुका आंबेगाव येथे चालू करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण केंद्र सन २०१८-१९ या वर्षापासून नागापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे सुसज्ज इमारतीमध्ये स्थलांतरित झालेले आहे.

सन २०१८-१९ मध्ये सदर प्रशिक्षण केंद्रात प्रत्येकी चाळीस विद्यार्थ्यांच्या दोन बॅचेस पूर्ण झाले आहेत. सदर प्रशिक्षण केंद्र १० मे २०१९ पासून बंद आहे. तरी ते लवकरात लवकर चालू करणे बाबत माननीय प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.याबाबत लवकरच सदर प्रशिक्षण केंद्र वरिष्ठ कार्यालयास कर्मचारी मानधन बाबत चर्चा करून चालू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. याप्रसंगी ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉइज फेडरेशन आंबेगाव सेक्रेटरी शंकर गाडेकर ,सदस्य बाळशिराम साबळे, नीलेश धुमाळ ,विजय साबळे, गणेश गेंगजे आदी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *