आख्खा जुन्नर तालुका बिबट्याचे माहेरघर आहे.

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी 
७ फेब्रुवारी २०२२

खामुंडी 


खामुंडी (ता. जुन्नर) येथील खामुंडी ते बदगी बेलापूर रस्त्याच्या परीसरात साधारण आठ दिवसांपूर्वीपासून भर दिवसा बिबट्याचे दर्शन सुलभ झाले असून आत्तापर्यंत एकाच आठवड्यात या भागात हा तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे, सोमवार ता.७ रोजी रवींद्र डोंगरे व कैलास शिंगोटे आणि किसन शिंगोटे या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी जवळच गत काही दिवसांपूर्वी ओढ्यात जखमी अवस्थेतील दोन बिबट्यांना वनविभागाने जखमी अवस्थेत असताना ताब्यात घेतले होते. अगदी तशाच घटनेची पुनरावृत्ती झाली याच परिसरात असणारे शेतकरी महेश गंभीर, संदीप गंभीर यांच्या शेतजमिनी जवळच्या ओढ्यात बिबट्याचा आणखी एक तिसरा बछडा दिसून आला उपेंद्र डुंबरे यांनी त्वरित पत्रकार कैलास बोडके यांना संपर्क केला असता बोडके यांनी घटना स्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्या नंतर त्यांनी लागलीच वनक्षेत्रपाल सुधाकर गिते यांना संपर्क करून घटना कळवली जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमित भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर निखिल बनगर,ओतूर वनक्षेत्रपाल वैभव काकडे,वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक महेंद्र ढोरे, वैभव नेहरकर,आकाश डोळे,किसन केदार, साहेबराव पारधी ,गंगाराम जाधव, यांनी घटना स्थळी धाव घेऊन ओढ्यात असणाऱ्या बिबट्याच्या बछड्याला डॉक्टर निखिल बनगर यांनी या सगळ्यांच्या मदतीने रेस्क्यू करून ताब्यात घेतले व पुढील उपचारासाठी माणिक डोह बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात आले आहे.

आठवड्यात एकाच परिसरात सापडला तिसरा बिबट्या

माणिक डोह येथे डॉ. निखिल बनगर हे बिबट्याच्या बछड्यावर सध्या उपचार करत असल्याची माहिती सुधाकर गिते यांनी दिली असून याच परिसरात आठ दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या दोन मादी बिबट्याच्यापैकी हा बछडा असावा अशी शक्यता वनविभागाच्या वतीने वर्तविन्यात आली आहे.आज मिळून आलेला बछडा हा नऊ महिने वयाचा असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे .मात्र या परिसरात आढळून येत असलेल्या बिबट्यांमुंळे शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले असून दिवसा शेतात काम करणे मुश्किल झाले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *