जिल्हा परिषद शाळा पिंगळवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
३१ डिसेंबर २०२१

आंबेगाव


आंबेगाव तालुक्यातील जिल्हापरिषद शाळा पिंगळवाडी/कोटमदरा शाळेतील विद्यार्थ्यांना काळेश्वरी चँरीटेबल ट्रस्ट रेनावळे वाई यांच्या माध्यमातून शालेय बॅग व शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले.प्रथम आलेल्या पाहुण्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगळवाडी मधील विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात ईशस्तवन स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान काळेश्वरी चँरीटेबल ट्रस्टचे संस्थापक ज्ञानदेवशेठ सणस यांनी भूषविले तर त्यांच्यासोबत चँरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.सुभद्राताई सणस व बबनराव सणस सरपंच आसरे,कृष्णा कांबळे,राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक व सुरेश वाघ ,अध्यक्ष शिवमुद्रा प्रतिष्ठान तसेच तानाजी सणस उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू लांघी यांनी केले. तर संतोष डगळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मा.अध्यक्ष यांनी मुलांना साहित्य कसे वापरावे याचे मार्गदर्शन केले. तसेच कृष्णा कांबळे सर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत चँरीटेबल ट्रस्टचे कार्य सांगितले या प्रसंगी पंचायत समितीचे सभापती संजय गवारी , मा सभापती कैलास बुवा काळे , घोडेगावचे साहायक पोलिस निरिक्षक जीवन माने , आरोग्य विभाचे काळे सर, नारोडी हायस्कूलचे मुख्याध्यापक गाडे सर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यासाठी सातारा येथील जिल्हापरिषद सदस्य सौ रंजनाताई डगळे व संतोष डगळे यांनी प्रयत्न केले. शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यासाठी माननीय श्री राजूशेठ लांघी, प्रवीण कोकणे यांनी विशेष प्रयत्न केले .कार्यक्रमाच्या वेळी पिंगळवाडी गावचे सरपंच श्रद्धाताई भवारी. गणपत भवारी,बिरसा ब्रिगेडचे आंबेगाव उपाध्यक्ष .दत्तात्रय वाघ,ग्रामपंचायत सदस्य सौ उज्वला भवारी ,सौ प्रतिमा पिंगळे ,श्री किरण हुले दोन्ही शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,मुलांचे पालक उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळा पिंगळवाडी कोटमदरा गावचे शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिक्षक संतोष पडवळ यांनी मानले तर आभार रोहिदास पिंगळे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *