धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे सामाजिक दायित्व उल्लेखनीय – संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१९ नोव्हेंबर २०२१

नारायणगाव


नारायणगाव व वारूळवाडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप तसेच विद्यार्थ्यांना दिली जाणारी रोख शिष्यवृत्ती वितरण हे धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे सामाजिक दायित्व इतरांसाठी प्रेरणादायी व उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय गुलाबराव डेरे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन सभा व शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटपाच्या कार्यक्रमात खासदार डॉ.अमोल कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

संस्थापक स्वर्गीय गुलाबराव डेरे पाटील यांच्या स्मृती दिनी शिष्यवृत्तीचे वाटप

याप्रसंगी युवा नेते अमित बेनके, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर , सरपंच योगेश पाटे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे, आंबेगाव महिला राष्ट्रवादी अध्यक्ष सुषमाताई शिंदे, अरुण पारखे, प्रमोद डेरे श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे,अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे, ग्रामपंचायत सदस्य विनायक भुजबळ, रामदास अभंग, सारिका डेरे, कैलास डेरे, रोहिदास केदारी,आशिष माळवदकर,राहुल बनकर, सदाशिव भुसारी, विलास गायकवाड,किशोर डेरे, राजेंद्र सुराणा,समीर मेहेत्रे,विकास तोडकरी, संस्थेचे सभासद , महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. “विद्यार्थ्यांनी मिळवलेली शिष्यवृत्तीही कर्तुत्वाची बाब असते, स्वकर्तुत्वाने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवलेलं यश कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असेही खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते पतसंस्थेने सुरू केलेल्या कोअर बँकिंग प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच संस्थेला नुकताच राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रामीण बिगरशेती पुरस्कार मिळाल्याबद्दल सभासदांच्या वतीने संस्था पदाधिकाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा तसेच नारायणगाव वारूळवाडी परिसरातील दहा जिल्हा परिषद शाळांमधील पन्नास विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन सुमारे पन्नास हजार रुपयांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, युवा नेते आमित बेनके, सरपंच योगेश पाटे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमांचे प्रास्ताविक वसंतराव देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन मेहबूब काझी व ज्ञानेश्वर औटी यांनी केले. आभार राजेंद्र कोल्हे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *