चऱ्होलीत सव्वा लाखांचा ऐवज घरफोडीत लंपास

१२ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


दरवाजाचे कुलूप उघडून घरात शिरलेल्या चोरट्याने सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार चऱ्होली येथे घडला. याप्रकरणी आशिष प्रकाश वैद्य (रा. तनिष्क ऑर्चिड सोसायटी, चोविसावाडी, चऱ्होली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून चोरटा आत शिरला. त्यानंतर बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉक चावीने उघडून एक लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *