मंगेश शेळके ओझर प्रतिनिधी
- पुणे, दि. ७ मे २०२१
महाराष्ट्रातील सर्व रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या आयोजकांना लढा रक्तदानाच्या टिमच्या वतीने सर्व आयोजकांचे मनापासून अभिनंदन करण्यात आले.
दिनांक ९ व १४ मे रोजी विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून अनेक ठिकाणी आयोजकांकडून शिबिराचे आयोजन करणाऱ्यांसाठी संपर्क होत आहे.परंतु लढा रक्तदानाचा यांच्यावतीने एक आवाहन करण्यात येते की ज्या आयोजकांनी आता शिबिराचे आयोजन केले आहे त्यांनी आता निर्धारित वेळेत घ्यावे व ज्या आयोजकांना शिबिराचे आयोजन करायचे आहे त्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घ्यावे याचे कारण म्हणजे आता रक्ताचा पुरवठा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे.
तसेच संपूर्ण रक्ताची वैधता ही ३५ दिवस असते तर साठवण रक्ताची मर्यादा ही ४२ दिवस असते. ज्या तरुण तरुणींनी आता लसीकरण केले असल्याने रक्तदानासाठी लगेच पात्र होत नाही.त्यामुळे पुढील महिन्यात रक्ताचा पुरवठा कमी पडेल म्हणून महाराष्ट्रातील सर्व आयोजकांना एक विनंती आहे की आपण हि शिबिरे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात घ्यावी जेणेकरून या रक्ताची खरी गरज गरजूंना मिळेल.तुम्ही देत असलेल्या रक्तपेढ्यांकडे रक्ताचा पुरवठा किती आहे याची खातरजमा करावी .आज रक्तदाना बरोबर प्लाजमा दानाची जास्त गरज असते. प्लाजमा दान तुम्ही जास्तीत जास्त १५ दिवसांनी पुन्हा पुन्हा करू शकता. परंतु रक्तदान केल्यानंतर तुम्ही पुन्हा रक्तदान ३ महिन्यांनी करू शकता. म्हणून लढा रक्तदानाचे मुख्य संघटक ऋषी साबळे यांनी सर्व शिबिर आयोजकांना व रक्तदान तसेच प्लाजमा दान करणाऱ्या सर्वांना आवाहन केले आहे की आपण हि रक्तदान शिबिरे थोडा कालावधी ठेवून घ्यावी.