महिलांच्या लैंगिक छळाला अटकाव घालण्यासाठी मानसिकता बदलाची गरज – अमृता तेंडुलकर

रोहित खर्गे विभागीय संपादक ११ डिसेंबर २०२१ पिंपरी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ या विषयी  जनमानसात जनजागृतीची  आवश्यकता  असून   पुरुषांसहसंपूर्ण  समाजाचीच  स्त्रियांविषयीची मानसिकता  बदलण्याची   गरज  आहे  असे मत  महिलाविषयक कायद्यांच्या अभ्यासक  अमृता तेंडुलकर यांनी  व्यक्त केले.केंद्रीय  युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाचे  नेहरू युवा केंद्र, यशस्वी  एकेडमी फॉर स्किल्स व एव्हीके  लॉ असोसिएट्स यांच्या  संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत  त्या बोलत  होत्या.९ डिसेंबर २०१३ रोजी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३   हा कायदा  अस्तित्वात  आला, त्याच तारखेचे औचित्य साधून या कायद्याच्या  जनजागृतीसाठी  या कार्यशाळेचे  आयोजन करण्यात  आले होते. यशस्वी संस्था ,नेहरू युवा केंद्र व एव्हीके लॉ असोसिएट्स यांच्या संयुक्त

Read more