जुन्नरच्या पहिल्या महिला आमदार लताबाई (नानी) श्रीकृष्ण तांबे यांचे वृद्धपकाळाने निधन…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पुणे- दि २९ मे २०२१
माजी आमदार श्रीमती लताबाई श्रीकृष्ण तांबे नानी यांचे आज शनिवार दिनांक २९ मे २०२१ रोजी ( श्री गणेश चतुर्थी) सायंकाळी ७ -१५ वाजता पुणे येथे वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक ३० मे २०२१ रोजी सकाळी १० वाजता श्री कपर्दिकेश्‍वर मंदिराजवळ होणार आहे . स्वर्गीय आमदार कै.श्रीकृष्ण रा. ताबे झांबर शेठ यांच्या त्या धर्मपत्नी होत्या. १९७३ च्या विधान सभा पोट निवडणुकीमध्ये त्या जुन्नर विधानसभा मतदारसंघातून प्रथम महिला आमदार म्हणून निवडून आलेल्या होत्या. त्यानंतर त्या जुन्नर पंचायत समितीवर स्वीकृत सदस्य होत्या त्याच दरम्यान त्या पूणे जिल्हा महिला दक्षता समितीच्या सदस्या म्हणून पण काम करत होत्या ग्राम विकास मंडळ ओतूर श्री कपर्दिकेश्‍वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल शेठ तांबे, सेवानिवृत्त बँक अधिकारी श्री शशिकांत तांबे, संरक्षण विभागातून सेवानिवृत्त
झालेले श्री दीपक तांबे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे मध्ये कार्यरत असलेले श्री किशोर तांबे सर यांच्या त्या मातोश्री होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *