माझ्या वक्तव्याचं राजकारण केलं जात आहे; वादग्रस्त वक्तव्यानंतर भुजबळांचं स्पष्टीकरण

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ सप्टेंबर २०२२


राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वतीच्या फोटोवरुन केलेल्या वक्तव्यावरुन राज्यभरात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या वक्तव्याचं राजकारण केलं जात आहे. समता परिषदेच्या कार्यक्रमात मी केवळ माझं मत मांडलं होत. प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. मी इतकेचे म्हटले की फुले, शाहू, आंबेडकरांनी आपल्याला प्रत्यक्ष शिकवले आहे आणि त्यांचा आम्ही आदर करायला हवा. आपण त्यांची का पूजा करत नाही. त्यांची पूजा करायला हवी, असे माझे म्हणणे होते. सरस्वतीने आपल्याला काही शिवकवले नाही, त्यामुळे पूजनाचा प्रश्न येतोच कुठे, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. कोणाचे फोटो काढा किंवा लावा, असं मी म्हणालो नव्हतो. मात्र, माझ्या वक्तव्याचा राजकीय मुद्दा बनवला जातो आहे असंही छगन भुजबळ म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *