खामुंडीची धर्मनाथ यात्रा बैलगाडा शर्यतीविना.
कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
०२ फेब्रुवारी २०२२
खामुंडी
दर्शनालाही भाविकांची तुरळक गर्दी
नगर- पुणे जिल्ह्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या खामुंडी (ता. जुन्नर) येथील डोंगरावरील धर्मनाथाची यात्रा साधेपणाने व बैलगाडी शर्यतीविना पार पडली.देवदर्शनासाठी भाविकांची तुरळक गर्दी निदर्शनास आली. येथील यात्रेला जुन्नर,खेड, आंबेगाव,पारनेर,अकोले,मुरबाड आदी तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते परंतु वर्षानूवर्ष चालत आलेली बैल गाड़ा शर्यतींची परंपरा यावर्षी कायद्याने नियम घालून बंद असल्यामुळे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा समितीने बैलगाडा शर्यत बंद ठेवली होती बैलगाडा शर्यतबंदीचा मोठा आर्थिक फटका वडापाव,भेळ,आईस्क्रीम,रसवंती गृह,पाणी व खेळणी विक्रेते या छोट्या व्यावसायिकांना बसल्यामुळे व बैलगाडा शर्यत वरील अनेक नियम बंदी असल्यामुळे जन सामन्यांमध्ये तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत होत्या.
या बाबत सविस्तर माहीती देताना काळभैरव नाथ ट्रस्ट चे अध्यक्ष मारुती बाबुराव शिंगोटे आणि कार्याध्यक्ष संदीप पांडुरंग गंभीर यांनी माहीती दिली की, दर वर्षी माघ महिन्यात येणारी ही धर्म नाथ देवस्थान यात्रा म्हणजे बैलगाडा शर्यतीचे जुन्नर तालुक्यातील एक आगळे वेगळे आकर्षण असायचे बैल गाडा शर्यती साठी शेकडो गाडा मालक या स्थानावर हजेरी लावत असत तितक्याच पटीत हज़ारोंच्या संख्येने भावीक भक्त,प्रेक्षक वर्ग बैल गाडा शर्यत पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजेरी लावत होते .परंतु सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बैल गाडा शर्यती वरील बंदी कायम असल्याने यावर्षी बैलगाडा मालकांच्या पदरी निराशा आली.
पण बैल घाटात पळणार कधी ? एक यात्रेकरू
बैल गाडा शर्यती वरील नियमांची बंदी उठनार तरी कधी? असा परखड सवाल एका यात्रेकरूने केला, परंपरे प्रमाणे रामभाऊ मारुती भोर यांचे हस्ते पहाटे धर्मनाथाची विधिवत महापूजा व अभिषेक करण्यात आला त्यानंतर दिवसभर सहकुटुंब सहपरिवार बैलगाडीत बसण्याचा आनंद घेत भाविक धर्मनाथ दर्शनासाठी येत होते. कै. संतोष काशिनाथ शिंगोटे यांच्या स्मरणार्थ जनसेवा ग्रुपच्यावतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.