श्री बांठिया प्राथमिक जैन विद्या मंदिर शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड संचलित श्री बांठिया प्राथमिक जैन विद्या मंदिर शाळेत मंगळवार दिनांक२६/१२/२०२३ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले
याप्रसंगी राजेशकुमारजी नौपतलालजी सांकला .(सहाय्यक सेक्रेटरी श्री जैन विद्या प्रसारक मंडळ) अॅडव्होकेट राजेंद्रकुमार जी शंकरलालजी मुथा. (ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री जैन विद्या प्रसारक मंडळ, चिंचवड)प्राध्यापक अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया. (सहाय्यक सेक्रेटरी श्री जैन विद्या प्रसारक मंडळ.)राजेंद्र कुमारजी कस्तुरचंदजी सुराणा( उपाध्यक्ष ,श्री जैन विद्या प्रसारक मंडळ) प्रकाशचंदजी बन्सीलालजी बंब (कार्यकारणी सदस्य श्री जैन विद्या प्रसारक मंडळ) हे उपस्थित होते.
त्याचप्रमाणे संगीता तरडे (डिपार्टमेंटल एडिटर आपला आवाज न्यूज नेटवर्क)

राजेश मोरे साहेब(PSI चिंचवडगाव पोलीस स्टेशन) हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे, नृत्यांचे, मुलाखत अहवालाचे, कौतुक केले. स्नेहसंमेलनात गणेश वंदना, वेलकम सॉंग, लहान मुलांची बहारदार नृत्ये,शिवरायांचा पोवाडा तसेच विविध लोकनृत्यानी सर्व रसिक व पालक वर्गाची दाद मिळवली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मुसळे एस. डी .यांनी प्रास्ताविक केले त्याचप्रमाणे विभाग प्रमुख श्री फंड व्ही. बी. यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय केला .शिक्षक प्रतिनिधी श्री पोटघन एस .जी.हे उपस्थित होते. सौ शेवकरी आर. आर. व सौ धोकटे ए .सी. यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *