महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने आत्तापर्यंत साडेतीन हजार बालकांना गोवरचा डोस

२४ डिसेंबर २०२२

पिंपरी


महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने आत्तापर्यंत एकूण ३ हजार ५९८ बालकांना गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. तर, ३२ हजार ८४७ बालकांना व्हिटॅमिन एची मात्रा देण्यात आली आहे. कुदळवाडी येथे सुरुवातीला २९ नोव्हेंबरला ५ जणांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर थेरगाव परिसरातदेखील गोवरचे २ रुग्ण आढळले. सध्या शहरातील विविध भागांमध्येदेखील गोवरचे रुग्ण आढळले आहेत.

गोवरबाधित रुग्णांची संख्या२६ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामध्ये गेल्या महिनाभरात नव्याने आढळलेल्या २२ गोवरबाधित बालकांचा समावेश आहे. तर, ४बालकांना गेल्या वर्षभरात लागण झालेली आहे. शहरामध्ये १ जानेवारीपासून आत्तापर्यंत गोवरचे एकूण४४२ संशयित रुग्ण आढळले आहेत. महापालिकेतर्फे गोवर प्रभावित भागामध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. आत्तापर्यंत ३ लाख १० हजार ४६९ घरांमध्ये सर्वेक्षण केले आहे. जवळपास १० लाख ८८ हजार २५ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या वतीने ५ वर्षाखालील ६७हजार ९२४ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *