४० टक्के जादा परतावा देण्याच्या आमिषाने २३ लाखांचा गंडा

पिंपरी प्रतिनिधी
०१ ऑक्टोबर २०२२


ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास ४० टक्के जादा परतावा मिळेल, असे आभासन देऊन दोषांनी एकाची २३ लाख रुपयांची फसवणूक केली . ही घटना ऑगस्ट २०२२ ते २ ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत नवी सांगवी येथे घडली. रणजित महादेव ढोमसे ( ४०, रा . नवी सांगवी ) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, रोहन शहा , राहुल मेहरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार , आरोपींनी फिर्यादी यांना एका वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास त्यावर ४० टक्के परतावा मिळेल , असे आमिष दाखवले . दरम्यान , फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून २३ लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले त्यांनतर फिर्यादींना कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केली . सांगवी पोलिस तपास करीत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *