भाजप नगरसेविका आशा शेडगे यांचा आयुक्त राजेश पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न फसला. आशा शेडगे पोलिसांच्या ताब्यात

रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी- दि ९ सप्टेंबर २०२१

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यालयासमोर गोंधळ करत भाजपाच्या महिला नगरसेविका आशा शेडगे यांनी आयुक्तांच्या नावाच्या बोर्डवर काळी शाई फेकून फेकली आणि एकच गोंधळ उडाला.

याप्रकरणी नगरसेविका आशा शेडगे यांच्यासह काही महिलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले.

नगरसेविका शेडगे यांच्या प्रभागातील दापोडी परिसरात पालिकेकडून काही कामानिमित्त खोदकाम सुरू आहे त्याचा नागरिकांना त्रास होतोय. त्यामुळे नगरसेविका शेडगे महिलांना घेऊन आयुक्त कार्यालयासमोर पोहोचल्या यावेळी आयुक्‍तांच्या अंगावर शाई फेकण्याचा त्यांचा हेतू होता पण शाई महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडली अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली मग या महिलांनी आयुक्तांच्या नावाच्या बोर्डवर शाई फेकली त्यामुळे पालिका इमारतीमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले व नगरसेविका शेडगे व इतर महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *