बैलगाडा शर्यतीत सुमारे ६ कोटी रुपयांची उलाढाल

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०२ जून २०२२

टाळगाव चिखली


भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत अशी ओळख निर्माण झालेल्या शर्यतीत पाच दिवसांत सुमारे ६ कोटी रुपयांची उलाढाल झाली. तसेच, सुमारे साडेचार लाख प्रेक्षक, बैलगाडा शौकींनांनी प्रत्यक्ष घाटात हजेरी लावली. विशेष म्हणजे, विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे ५० ते ५५ लाख नेटिझन्सनी बैलगाडा शर्यतींचा लुटला, अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे यांनी दिली. भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर राहुल जाधव आणि माजी महापौर नितीन काळजे यांच्या वतीने टाळगाव चिखली येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले. त्याचा परितोषिक वितरण समारंभ मंगळवारी सायंकाळी झाला. जय हनुमान बैलगाडा मंडळाच्या वतीने शर्यंतीचे संयोजन करण्यात आले.

थेट प्रक्षेपणाद्वारे ५० ते ५५ लाख नेटिझन्सनी लावली ऑनलाईन हजेरी

संदीप बोदगे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 5 दिवस बैलगाडा शर्यत आयोजन करण्यात आले होते. आधी एकदिवस टोकन वाटप करण्यात आले. यासाठी जवळपास दोन हजार टोकनची नोंदणी प्रत्येक दिवशी 300 बैलगाडा घाटात पळविण्यात आले. यासाठी प्रत्येक दिवशी किमान 1 हजार 200 बैलांना सहभागी करण्यात आले. प्रत्येक दिवशी दोन बैलांसाठी एक पीकअप याप्रमाणे जवळपास दररोज 600 पिकअप गाड्याभाडे ठरून वाहतुकीसाठी शेतकऱ्यांनी वापरल्या आहेत.

 बैलगाडा मालक, शौकींनाकडून रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद

रोज सुमारे 90 हजार प्रेक्षकांची उपस्थिती…
शर्यतीच्या ठिकाणी विविध प्रकारचे बैलांचे व शर्यतीचे साहित्य विकणारी दुकाने,तसेच उपस्थित प्रेक्षकांसाठी नाश्ता ज्यूस आइस्क्रीम पिण्याचे पाणी इत्यादीची व्यवस्था असलेली दुकाने थाटण्यात आली होती. तिला साधारणतः प्रत्येक दिवशी 80 ते 90 हजार प्रेक्षक उपस्थित होते. शर्यतीचे ठिकाणी मंडप व्यवस्था,  लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था, तसेच हॉलमध्ये स्क्रीनवर शर्यत दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जेसीबी, बुलेरो, दुचाकीसह रोख बक्षीसांची लयलूट

खिलार गाय- बैलांचे प्रदर्शन…
खिलार गाय- बैलांचे प्रदर्शनमध्ये जवळपास तीनशे जनावरांनी भाग घेतला.  प्रदर्शनसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे-अहमदनगर या जिल्ह्यातून जातिवंत खिलार जनावरे सहभागी झाली होती. या जनावरांसाठी प्रदर्शन ठिकाणी स्वतंत्र मंडप व्यवस्था करण्यात आली होती. बैलगाडा शर्यतीसाठी प्रामुख्याने अहमदनगर ,पुणे तसेच सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, नाशिक, हिंगोली या जिल्ह्यातून बैलगाडा मालक बैलांसह उपस्थित होते. तसेच मध्य प्रदेश कर्नाटक या राज्यातूनही शर्यतीसाठी काही बैल उपस्थित होते.

शर्यतीचा निकाल पुढीलप्रमाणे:

१- नंबर फायनल : रामनाथ विष्णू वारिंगे-(११:२२), राजूशेठ जवळेकर-(११:२४), संतोष ज्ञानेश्वर मांडेकर सरपंच आंबेठाण – (११:३१), बाबुराव आबाजी वायकर वडगाव मावळ – (११:३६), अजिंक्य खांडेभराड(११:३७).
२- नंबर फायनल: आमदार सुनील आण्णा शेळके, मावळ (११:४०), काळ भैरवनाथ मित्र मंडळ, करंजविहीरे (११:५६), पांडुरंग किसन काळे (११:५६), भालेराव साहेब कळंब (११:६७).
३- नंबर फायनल : कै. रामशेठ बाबुराव थोरात, मयूर हॉटेल -(११:६९), बापू आल्हाट (११:६९), कै. सदाशिव महिपती लांडगे (११:७०).
४- नंबर फायनल: नवनाथ होले सभापती – (११:७१).
५- नं. फायनल: थोरात भक्ते – (११:७३).
६- नं. फायनल ज्ञानेश्वर तापकीर – (११:७४).
७- नंबर फायनल: शिवाजी संपत निघोट – (११:७५).
८- नंबर फायनल: आदित्य सुखदेव भंडारी (११:७९)


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *