NEWS
/ FEATURED
-
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारतीत अडकलेल्या ८ जणांचा मृत्यू;दुर्घटनेतील मृतांची संख्या 9 वर
पिंपरी, दि. ११ जुलै २०२६ : मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये आज चौथ्या दिवशी शोधमोहीमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत झालेल्या मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कचऱ्याचा ढीग ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर…
-

मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा,दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – कामगारनेते यशवंत भोसले
पिंपरी:प्रशासनाने केवळ पंचनामे आणि पाहणी करण्याऐवजी मोशी कचरा डेपो दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष,कामगार नेते यशवंत भोसले यांनी आज (दि.११)पत्रकार परिषदेत येथे केली. कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित ठेकेदारांना जबाबदार धरल्याशिवाय अशा दुर्घटना थांबणार नाहीत,असे ते म्हणाले. कचरा संकलन, स्वच्छता, पाणीपुरवठा यांसारखी कायमस्वरूपी कामे कंत्राटी पद्धतीने…
-

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी
बचावकार्याचा घेतला आढावा; बाधितांच्या नातेवाईकांशी साधला संवाद, प्रशासनाला दिल्या आवश्यक सूचना पिंपरी, दि. ११ जुलै २०२६: मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोध व बचावकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून बचावकार्याचा सविस्तर आढावा घेतला तसेच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या…














