कांदळी येथील कला केंद्रावर गोळीबारएक जण जखमी, चार आरोपी फरार

नारायणगाव :-(किरण वाजगे, कार्यकारी संपादक)पुणे जिह्यातील जुन्नर तालुक्यातील कांदळी गावच्या हद्दीत असलेल्या तुळजाभवानी सांस्कृतिक कलाकेंद्र, येथे एका युवकाने केलेल्या गोळीबारात ओतूर येथील तरुण जखमी झाला असून, त्याला आळेफाटा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी दि ८ रोजी पहाटे घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण येथील कोळेकर(पूर्ण नाव माहित नाही),अण्णा, चिनू (पूर्ण नावे माहीत…

नारायणगाव :-(किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
पुणे जिह्यातील जुन्नर तालुक्यातील कांदळी गावच्या हद्दीत असलेल्या तुळजाभवानी सांस्कृतिक कलाकेंद्र, येथे एका युवकाने केलेल्या गोळीबारात ओतूर येथील तरुण जखमी झाला असून, त्याला आळेफाटा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी दि ८ रोजी पहाटे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण येथील कोळेकर(पूर्ण नाव माहित नाही),अण्णा, चिनू (पूर्ण नावे माहीत नाही) व एक अनोळखी इसम असे चार तरुण कांदळी तालुका जुन्नर येथील तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्र येथे कार्यक्रमाची बारी लावण्यासाठी गेले होते.
या चौघांनी बारी लावण्याच्या कारणावरून बारी मालकीण, कामगार व फिर्यादी यांच्याशी वाद घातला. त्यानंतर तिसरी बारी न लावल्याने बारी मालकीण मनीषा, फिर्यादी अक्षय अनिल धोंगडे आणि कामगारांना शिवीगाळ दमदाटी करून चार आरोपींनी धक्काबुक्की करून, हाताने मारहाण केली. व फिर्यादीसह, कामगार आणि बारी मालकीण मनीषा हिस जीवे मारण्याच्या उद्देशाने चार पैकी एका इसमाने त्याच्या जवळील पिस्तूल काढून मारू का? मारू का? असे म्हणत फिर्यादी अक्षय धोंगडेवर पिस्तूल मधून फायर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
प्रसंगावधान राखून फिर्यादी तात्काळ बाजूला सरकला त्यामुळे गोळी लागली नाही. मात्र त्याचवेळी तेथे जमलेल्या इसमापैकी फिरोज कादिर शेख (वय ३१ वर्ष, राहणार भोई गल्ली, ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे याला लागून तो जखमी झाला आहे.त्यामुळे बारी लावण्यासाठी आलेल्या कोळेकर, आण्णा, चिनू आणि त्याचे सोबत असणाऱ्या एका अनोळखी इसम आशा चार जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
नारायणगाव पोलिसांनी फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी भेट दिली असून, चारही फरारी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे,पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील करीत आहेत.