​उद्यापासून राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान; ‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्षानिमित्त आयोजन

प्रतिनिधी पिंपरीः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्यात उद्यापासून (ता.९) १७ ऑगस्टपर्यंत ‘हर घर तिरंगा’ अभियान साजरे केले जाणार आहे.केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्याने ते राबविण्याचे ठरवले आहे.त्याचे वैशिष्टे म्हणजे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ला यावर्षी १५० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त विविध देशभक्तीपर उपक्रमांची जोड त्याला देण्यात आली आहे.दरम्यान,शहर भाजपानेही या उपक्रमाची जोरदार तयारी केली असून त्यासाठी बैठकाही…

प्रतिनिधी

पिंपरीः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्यात उद्यापासून (ता.९) १७ ऑगस्टपर्यंत ‘हर घर तिरंगा’ अभियान साजरे केले जाणार आहे.केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्याने ते राबविण्याचे ठरवले आहे.त्याचे वैशिष्टे म्हणजे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ला यावर्षी १५० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त विविध देशभक्तीपर उपक्रमांची जोड त्याला देण्यात आली आहे.दरम्यान,शहर भाजपानेही या उपक्रमाची जोरदार तयारी केली असून त्यासाठी बैठकाही घेतल्या आहेत.

या अभियानात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण आणि देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम होईल.तसेच शासकीय व सार्वजनिक स्तरावर विविध उपक्रम राबवले जातील.त्यात ​विभाजन विभीषिका स्मृतीदिनी (ता.१४)राज्यस्तरीय कार्यक्रम,प्रदर्शने आणि नाटकांचे आयोजन करण्यात आगेले आहे.तसेच शालेय व महाविद्यालयीन स्तरावर परिसंवाद, चर्चासत्रे आणि १५ सप्टेंबरपर्यंत MyGov पोर्टलवर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली गेली आहे.नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी तिरंगा रॅली आणि तिरंगा ई-बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे.सर्व शासकीय कार्यालये,महापालिका, जिल्हा परिषदा आणि प्रमुख इमारतींवर तिरंगा रंगाची आकर्षक रोषणाई केली जाणार असून शाळा-महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम थीमवर आधारित रांगोळी स्पर्धा होणार आहे.नागरिकांना या अभियानात डिजिटल माध्यमातून सहभागी होता येणार असून तिरंग्यासोबतचा फोटो किंवा ‘वंदे मातरम’ गीताचा व्हिडिओ https://harghartiranga.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.