नवनिर्वासित बार्शीकर आमदार राजेंद्र राऊत यांचा उद्या पिंपरी-चिंचवडमध्ये नागरी सत्कार

सोलापूर जिल्हा मित्र मंडळ,उद्योजक दिनेश मोरे व नगरसेवक तुषार हिंगे यांच्यातर्फे होणार प्रतिनिधी पिंपरी: सोलापूर जिल्ह्याच्य़ा बार्शी तालुक्यातील राजेंद्र राऊत यांची नुकतीच विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील सोलापूरवासीयांच्या वतीने उद्या (ता.९) नागरी सत्कार केला जाणार आहे.सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, पिंपरी-चिंचवड व पुणे शहर यांच्या वतीने तसेच उद्योजक…

सोलापूर जिल्हा मित्र मंडळ,उद्योजक दिनेश मोरे व नगरसेवक तुषार हिंगे यांच्यातर्फे होणार

प्रतिनिधी

पिंपरी: सोलापूर जिल्ह्याच्य़ा बार्शी तालुक्यातील राजेंद्र राऊत यांची नुकतीच विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील सोलापूरवासीयांच्या वतीने उद्या (ता.९) नागरी सत्कार केला जाणार आहे.सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, पिंपरी-चिंचवड व पुणे शहर यांच्या वतीने तसेच उद्योजक दिनेश मोरे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपा नगरसेवक तुषार हिंगे यांच्या पुढाकाराने व आयोजनातून तो सायंकाळी ५ वाजता, सीझन्स बॅंक्वेट हॉल, दुर्गा चौक, यमुना नगर, निगडी येथे होणार आहे.

या सत्कार सोहळ्यास राजकीय क्षेत्रातील मान्यवर, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील प्रतिष्ठित,सामाजिक कार्यकर्ते आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.आ.राऊत यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व सोलापूरवासीयांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक दिनेश मोरे, नगरसेवक तुषार हिंगे आणि सोलापूर जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.