राम नाम जपना,पराया माल अपना, हेच भाजपा चे धोरण ःगोपाळ तिवारी

अयोध्या राम मंदिरातील दक्षिणा चोरी हा संघटित दरोडा,काँग्रेसचा घणाघात

पिंपरी ःअयोध्येच्या श्रीराम मंदिरातील दानपेट्यांत भाविकांनी दक्षिणा म्हणून टाकलेली लाखो रुपयांची रोकड आणि मौल्यवान वस्तू मंदिरातील कर्मचाऱ्यांनीच चोरल्याचा खळबळजनक प्रकार गेल्या महिन्यात तेथील सीसीटीव्ही मुळे उघडकीस आला.ही चोरी नसून संघटित दरोडा असल्याचे सांगत त्याविरोधात काँग्रेसने शनिवारी (ता.११) राज्यातील मंदिरांबाहेर रघुपती राघव राजाराम हे सत्याग्रह आंदोलन करीत भाजपाचा निषेध केला.ते चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपुलाखालील मारुती मंदिराजवळ शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.यावेळी राम नाम जपना,पराया माल अपना,हेच भाजप चे धोरण असल्याचा घणाघात पक्षाचे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.

अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर ट्रस्ट मधील ४० दिवसांच्या सीसीटीव्हीतून ७० वेळा भाविकांच्या दानाची चोरी झाल्याचे दिसले.हा मंदीर ट्रस्ट कडून ‘रामा’प्रती श्रद्धा व आस्था बाळगणाऱ्यांचा विश्वासघात असून याविषयी पंतप्रधानांचे मौन मुजोरीपणाचा कळस आहे,असा हल्लाबोल यावेळी तिवारींनी केला.कसम राम की खाते है, मंदिर वही बनायेंगें,या भाजपच्या राजकारणाला त्यांनी मंदिर लुटीपर्यंत नेऊन आपला उद्देश रामाच्या नावाने सत्ता मिळवून रामाचीच लूट करून खिसे भरण्याचा आहे हे दाखवून दिले,अशी कडवट टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी यावेळी केली. 40 दिवस सातत्याने 70 दरोडे पडत असताना तिथे ट्रस्टमध्ये असणारे भाजपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक काय करत होते ? का त्यांचाही सहभाग याच्यामध्ये आहे? अशी विचारणा करीत त्यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे,असे ते म्हणाले. “चोरी और उपर सीना जोरी” असं सध्या याबाबत सुरु आहे,असा टोला त्यांनी लगावला.तर,ही चोरी लांच्छनास्पद असल्याचे सांगत मुह मे राम और बगल मे छुरी” या प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्यामुळे ती झाल्याचा घणाघात गांधीवादी विचारवंत बी.आर.माडगूळकर यांनी केला.हिंदू हिताची बात करणारे लोक आता हिंदू अहिताची कृती करत असून ते रामभक्त नसून नथुराम भक्त आहेत,असा टोला त्यांनी मारला. प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे,हिराचंद जाधव, अभिमन्यू दहीतुले, राहुल शिंपले, जितेंद्र छाबडा यांनीही मनोगत व्यक्त केले.

एन एस यु आय चे नेते अक्षय कांबळे, माजी नगरसेवक रामचंद्र माने, सेवादलाचे ज्येष्ठ नेते अशोक मंगल, पुणे जिल्हा सेवादल कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, सेवा दलाचे माजी अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, काँग्रेसचे माजी सरचिटणीस हरीश डोळस,अनुसूचित जाती विभागाचे माजी अध्यक्ष विजय ओव्हाळ, सुरज गायकवाड, रोहित भाट, कबीर मोहम्मद, संदीप शिंदे, संदेश जगताप, नासिर चौधरी, भास्कर नारखेडे, गुंगा शिरसागर, विल्यम साळवी, दीपक भंडारी, विलास सकट, नितीन सोनवणे, रितिका शर्मा, प्रवीण कांबळे, सुरज कोथिंबीरे, देवदत्त रानवडे,अलोक लाड, विवेक विधाते, सिल्वराज अँथोनी, साहेबराव खरात हे या आंदोलनात सहभागी झाले होते.