मोशीतील कचऱ्याचे डोंगर नष्ट करण्यास  गती द्या : मुख्यमंत्री फडणवीस

शहरात येऊनही मुख्यमंत्र्यांनी मोशी दुर्घटनास्थळी भेट न दिल्याने आश्चर्य व्यक्त

प्रतिनिधी

पिंपरी; संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या कचरा डेपोत झालेल्या दुर्घटनेचा आढावा वाकड येथील
येथील एका ताराकिंत हॉटेलात घेतला.यावेळी त्यांनी ज्या कचऱ्याच्या डोंगरामुळे हा अपघात झाला ते नष्ट करण्यास गती देण्याचे म्हणजे त्यासाठीच्या तेथील बायोमायनिंग प्रकल्पास वेग देण्याचे आदेश दिले.मात्र, शहरात येऊनही त्यांनी
मोशी येथील दुर्घटना स्थळी भेट न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.दरम्यान,रात्र झाल्याने आणि पुढे पुण्यात दोन्ही पालख्यांचे स्वागत व दर्शन घ्यायचे असल्याने मुख्यमंत्र्यांनी दुर्घटना स्थळी भेट दिली नसल्याचे सांगण्यात आले.

महापौर रवी लांडगे, भोसरीचे भाजपा आमदार
महेश लांडगे, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी,पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी मोशी कचरा दुर्घटनेची माहिती घेतली. संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला. यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश दिले. मोशी येथील लेगसी वेस्ट च्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्यास   सांगितले. याशिवाय, दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे 100 टन कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी उपाययोजना करण्याची सुचना महापालिका प्रशासनाला केली.

दरम्यान,यावेळी बचाव काम रात्री पूर्ण करेल, अशी माहिती आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना दिली. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेले व अद्याप न सापडलेल्या सात जणांचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.