कुदळवाडीत पोलिसांवर झालेल्या दगडफेकीवर आ.लांडगेंचा सवाल
उत्तम कुटे
पिंपरीः कुदळवाडी,चिखलीतील अवैध धार्मिक स्थळांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने काल (ता.९) कारवाई केली. तेव्हा बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर दगडफेक होऊन त्यात काही पोलिस जखमी झाल्याने भाजपाचे स्थानिक आमदार भोसरीचे महेश लांडगे यांनी संताप व्य़क्त करीत हा जिहादी उन्माद प्रशासनाने ठेचावा,अशी मागणी काल लगेच केली.तसेच हा जिहादी उन्मदा कदापी खपवून घेतला जाणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला होता.त्यानंतर या घटनेप्रकरणी चिखली पोलिसांनी धरपकड केलेल्या ३३ आरोपींवरून आ.लांडगे आज पुन्हा कडाडले.पोलिसांवर दगडफेक करणारे दंगेखोर एका विशिष्ट धर्मांचेच का आहेत,अशी विचारणा करीत कायदा हातात घेणाऱ्यांना कदापी माफी नाही,असे त्यांनी पुन्हा सुनावले.तसेच या कारवाईबद्दल शहर पोलिसांचे आभार मानले.
कालच्या दगडफेकप्रकरणी बीएनएस,आय़पीएसी,महाराष्ट्र पोलिस कायदा आणि सार्वजनिक मालमत्ता कायदा अशा चार कायद्यांन्वये दंगल करून जखमी करणे, सार्वजनिक मालमत्तेचे (सरकारी पोलिस व्हॅन)नुकसान करणे,सरकारी कामात अडथळा आणणे आदी आरोपांखाली तीनशे ते पाचशे जणांविरुद्ध चिखली पोलिसांनी काल गुन्हा दाखल केला.विशेष म्हणजे त्यात तीन अल्पवयीन आहेत.त्यात ३३ आरोपींच्या चिखली पोलिसांनी मुसक्या आवळल्या.नाजीम नईम चौधरी (वय २६),इजाज वकार चौधरी (वय २६),मोहम्मद उस्मान हुसेन इद्रीसी (वय २६), अब्दूल रहमान सरवरअली इद्रीसी (वय २८),आजम फकरुध्दीन रज्जाक (वय १९)मोहम्मद आसीफ हबीबुर रहेमान इद्रीसी (वय १८),
नसरुद्दीन अब्दुल हमीद सिद्दीकी (वय २०),रफीक शकील शेख (वय ३५),शाहीआलम अफजल सिद्दीकी (वय २४),साहिल अन्सारी शेख (वय ३०),गुलामहुसैन मैनुल्लाह खान (वय १९),निजाम हुसेन नायाब हुसेन सिद्दीकी (वय २२),अब्दूल करीम अलीममुल्ला चौधरी (वय ३५),रामदेव परमात्माप्रताप पांडे (वय ४८),फैजन नियाज चौधरी (वय २६),युसुफ खुर्शीदआलम चौधरी (वय २२),अकदस बरकतअली खान (वय १८),अबु सोफीया चौधरी (वय ३२),नसिम अहमद इद्रीसी (वय १९),मोहम्मदनवाज मोहम्मदअली खान (वय ३४),कयामुध्दीन सिराजउध्दीन चौधरी (वय २२),मोहम्मदकासिम मेहफुजअलम चौधरी (वय २४),फय्यज फत्तेह खान (वय २८),मकसूद मंजूर चौधरी (वय २१), मेहफुज मंजूर चौधरी (वय २६),आकाश रामविलास सूर्यवंशी (वय २१),जुनेद मजीद बेग (वय २०),मुराद मजीद बेग (वय ३४),
आरिफ वासउली इद्रीसी (वय ३८),अभिनंदन निरजकुमार यादव (वय १८),इलियास बासु तांबोळी (वय ४४),शादाब नौशाद मोमीन (वय ३३)आणि शाबाद मोहमद सय्यज (वय ३१) अशी त्यांची नावे आहेत.
अटक केलेल्या वरील आरोपींची यादी आ. लांडगे यांनी आज सोशल मिडियावर शेअर करीत ती एकदा वाचाच,असे सांगितले.त्याबरोबरच कायदा हातात घेणाऱ्यांना कदापी माफी नाही,असा इशारा पुन्हा दिला. ‘‘हिंदुत्ववादी’’ आहोत, म्हणून आमच्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी डोळे उघडून ही आरोपींची यादी वाचावी,असे सुनावले. दगडफेक करणारे दंगेखोर एका विशिष्ट धर्मांचेच का आहेत? हेच दगडफेक करणाऱ्या प्रवृत्तीचे लोक उद्या लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, धर्मांतर, गोहत्या यामध्ये सक्रीय सहभागी असतात, एकाच विशिष्ट धर्माची कशी असतात? मग, आम्ही हिंदुत्ववादी भूमिका मांडतो. त्यावेळी ‘‘अशा जिहादी प्रवृत्तींची मते नको…’’ असे म्हणालो तर काय चुकले..?असे पु्न्हा ठणकावले. तसेच कालची कारवाई कायद्याच्या चौकटीतच झाली,असे त्यांनी स्पष्ट करीत तिचे पूर्ण समर्थन केले.

