‘लाडक्या बहिणीं’कडे जबाबदारी; हा पक्षाचा विश्वासाचा निर्णय– डॉ.नीलम गोऱ्हे
उत्तम कुटे
पिंपरीः राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना सुरु केली.त्याच शिंदेंनी ठाणे,कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर या आपल्या ठाणे जिल्ह्यातील तिन्ही महापालिकांत महिला महापौर करायचे ठरवले आहे.विशेष म्हणजे तेथील महापौरपद महिलांसाठी राखीव नसताना शहराचे प्रथम नागरिक हे प्रतिष्ठेचे पद महिलांना देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.महिलांसाठी हे पद आरक्षित नसताना त्यांना ते मिळण्याची या महापालिकांच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.लाडक्या बहिणीं’कडे ही जबाबदारी; हा पक्षाचा विश्वासाचा ऐतिहासिक निर्णय आहे,अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली.
ठाण्यात शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड,कल्याण डोंबिवलीत हर्षाली थविल चौधरी,तर उल्हासनगर मध्ये अश्विनी निकम यांना शिवसेना महापौरपदी संधी देणार आहे.लाडक्या बहिणींनी शिवसेनेला निवडणुकीत भरभरून प्रतिसाद दिल्याने महापौरपद देताना त्यांना प्राधान्य द्यावे अशी आग्रही भूमिका एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि ठाणे जिल्ह्यातील कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी घेतली होती.त्यावर एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले.त्यामुळे या महापालिकांवर महिलाराज दिसणार आहे.त्यावर बोलताना महिलांच्या सक्षमीकरणाबाबत शिवसेनेची भूमिका केवळ घोषणापुरती न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरलेली यातून दिसून आल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.महिलांनी पक्षाला भरभरून पाठिंबा दिल्यानेत्यांची कुवत,नेतृत्व क्षमता व कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत त्यांना संधी देणे,ही खरी समानतेची भावना आहे.त्यामुळे आरक्षणाची वाट न पाहता त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्याचा पक्षाचा हा निर्णय प्रेरणादायी आहे.”असे त्या म्हणाल्या.
चौकट
स्थानिक ला शिवसेनेत महिला राज
मुंबईत निवडून आलेल्या शिवसेनेच्या २९ नगरसेवकांत १९ महिला आहेत.त्यांनी तेथे ९० जागांपैकी ६३ ठिकाणी महिलांना उमेदवारी देत त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला होता.महापालिकेपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांचे ६० नगराध्यक्ष निवडून आले.त्यात ३३ महिला आहेत. तर,आताही महापालिकेत त्यांनी महिलांसाठी महापौर पद राखीव नसतानाही तेथे लाडक्या बहिणींना संधी दिली आहे.एकूणच महापालिका असोत वा नगरपालिका सर्वच स्तरांवर ‘लाडक्या बहिणींचे’ नेतृत्व शिवसेनेत भक्कम होत आहे.

