प्रतिनिधी
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विजयनगर-आनंदनगर-एम्पायर इस्टेट-भाटनगर-पिंपरी कॅम्प या प्रभाग १९ मधील परिवर्तन विकास आघाडीच्या पॅनेलला एम्पायर इस्टेट सोसायटीने शनिवारी (ता.१०)आपला जाहीर पाठिंबा जाहीर केला. एम्पायर इस्टेट च्या क्लब हाऊस मधील बैठकीत परिवर्तन विकास आघाडीच्या चारही उमेदवारांनी सोसायटीतील रहिवाशांशी संवाद साधला.त्यावेळी त्यांना हे समर्थन देण्यात आले.

परिवर्तन आघाडीचे उमेदवार कविता शैलेश मोरे,अक्षय माच्छरे,जितू पहिलानी आणि अंजली वाघमारे यांच्यासह एम्पायर इस्टेट सोसायटीतील रहिवासी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते.माजी नगरसेवक शैलेश मोरे यांची प्रमुख हजेरी होती.यावेळी उमेदवारांनी सोसायटीतील नागरिकांच्या समस्या,अपेक्षा ऐकून घेत आपल्या विकासात्मक दृष्टीकोनाची मांडणी केली.

तर,एम्पायर इस्टेटमधील रहिवाशांनी गेल्य़ा वेळच्या भाजपा नगरसेवकांनी केलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. त्यामुळे यावेळी बदल घडवून आणण्यासाठी परिवर्तन विकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.या बैठकीत स्वच्छता,पाणीपुरवठा,रस्ते,वाहतूक आणि सुरक्षितता आदी मुद्द्यांवर चर्चा झाली.हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी दिले.नागरिकांचा मिळालेला पाठिंबा परिवर्तन विकास आघाडीच्या पॅनेलसाठी निश्चित बळ देणारा ठरणार असल्याचे चित्र दिसून आले.

