भाजपला पुणे जिल्ह्यात जोर का धक्का…बसणार,माजी जि.प.सदस्य शरद बुट्टे घरवापसी करणार

उत्तम कुटे
पिंपरीःस्थानिक संस्था निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील तिन्ही पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरु असले,तरी उत्तर पुणे जिल्ह्यात त्याला छेद बसणार आहे.तेथे गंगा उलटी वाहणार असून भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हाध्यक्ष (उत्तर पुणे तथा मावळ)आणि मुलूखमैदान तोफ शरद बुट्टे पाटील हे,मात्र पक्ष सोडणार आहेत.येत्या दोन-तीन दिवसांत घरवापसी करीत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी थोड्या वेळापूर्वी आपला आवाज ला सांगितले.त्यामुळे उत्तर जिल्हा नाही किमान खेड तालुक्यातील राजकारण दोन महिन्यांतच पु्न्हा कूस बदलणार आहे.११ वर्षानंतर बुट्टे यांची घरवापसी होत आहे.

खेड तालुक्यातील पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गटातून बुट्टे निवडून येत आहेत.मात्र,यावेळच्या आऱक्षणात त्यांचा गट हा महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांनी आपल्या पत्नी सुनीता यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे.ती कमळावरच सुरु होती.आता ती त्यांना घड्याळावर करावी लागणार आहे.यापूर्वी खेड तालुक्यातील दुसरे माजी जिल्हा परिषद सदस्य,तरुणांत मोठी क्रेझ असलेले अतुल देशमुख यांनी शरद पवार राष्ट्रवादीतून गेल्यावर्षी ६ नोव्हेंबरला शिवसेनेत प्रवेश केला.त्यानंतर झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी राजगुरुनगर परिषदेत आपला नगराध्यक्ष व सत्ताही आणली. तर,चाकणलाही आपलाच नगराध्यक्ष केला.ते भाजपकडूनच गेल्यावेळी जिल्हा परिषदेला निवडून आले होते.पण स्वाभिमानी व आक्रमक स्वभाव असल्याने अपमान सहन न झाल्याने त्यांनी भाजपला रामराम केला होता.त्यानंतर दुसरे ताकदवार माजी जिल्हा परिषद सदस्य बुट्टे यांनीही कमळ सोडून हातावर घड्याळ बांधायचा निर्णय़ घेतल्याने आगामी जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुकीत भाजपला तो मोठा धक्का असणार आहे.

mostbet

राज्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच अजितदादा यांनी आगामी जिल्हा परिषद व तालुका पंचायत निवडणुकीची तयारी तथा व्य़ूहरचना आतापासूनच सुरु केली आहे.त्यातून काल रात्री त्यांनी आपल्या पुण्यातील जिजाई बंगल्यावर बुट्टेंची भेट घेतली.तेव्हाच बुट्टे भाजप सोडणार असे स्पष्ट संकेत मिळाले.त्यावर आज त्यांनी आपला आवाज शी बोलताना शिक्कामोर्तब केले.खेड तालुक्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोनच मजबूत राजकीय पक्ष असून स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी ताकद मिळत नसल्याने राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या प्रवेशामुळे त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीला मोठी ताकद राष्ट्रवादीची मिळणार आहे.त्यांनी पदवीधर निवडणुकीत संधी न मिळाल्याने २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती.