पिं.चि.मनपा च्या प्रभाग २ मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे जाधववाडीत जल्लोषात स्वागत

प्रतिनिधी
भोसरीः महापालिका निवडणूक प्रचाराला पिंपरी- चिंचवडमध्ये आता वेग आला असून त्यात रंग भरू लागले आहेत.चिखली गावठाण,कुदळवाडी,जाधववाडी या प्रभाग दोनमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार वसंत बोराटे,विशाल आहेर, अश्विनी जाधव व रूपाली आल्हाट यांनी काल सायंकाळी जाधववाडी येथे प्रचार दौरा केला.त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. उमेदवारांचे तेथे त्यांचे स्थानिकांनी फटाके फोडून आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत मोठ्य़ा जल्लोषात स्वागत केले.

जाधववाडीतील आकाशवेध सोसायटीपासून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी पदयात्रेव्दारे प्रचाराला सुरवात केली.सिटी प्राइड स्कूल जवळील राधाकृष्ण सोसायटी,विष्णू विहार,विष्णू ग्रीन तसेच जाधववाडीच्या इतर भागातील सोसायट्यांमधील मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला.सोसायटी मधील मतदारांनी प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढत, फटाके फोडून तसेच उमेदवारांवर फुलांचा वर्षाव करत मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले.या पदयात्रा प्रचार दौऱ्यात उमेदवार,कार्यकर्ते आणि जाधववाडी परिसरातील मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.उमेदवार वसंत बोराटे, विशाल आहेर,अश्विनी जाधव आणि रूपाली आल्हाट यांनी या सोसायट्यांमध्ये जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला.ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले.मतदारांनी देखील उमेदवारांना निवडणूक विजयाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.उमेदवारांनी मतदारांसोबत विकास कामांबाबत यावेळी चर्चा केली.त्याला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.पदयात्रेत स्थानिक नागरिकांनी विविध समस्या व अपेक्षा उमेदवारांसमोर मांडल्या.त्यावर मांडलेल्या समस्या सोडवून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करू,असे उमेदवारांनी सांगितले.प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. या पदयात्रेमुळे प्रभाग दोनमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

mostbet