ज्यांच्यावर ७० हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी भ्रष्टाचारावर बोलावं, आ.महेशदादांचा अजितदादांवर पलटवार

माईक समोर आल्यावर एखाद्याविषयी वाईट बोलल्याशिवाय त्यांचं भाषण संपत नाही,चांगलं बोलता येत नाहीः महेशदादा

उत्तम कुटे
पिंपरीःसत्ताकाळात पाच वर्षात भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिका लुटून खाल्ली,तिला कर्जबाजारी केलं,या आरोपानंतर भ्रष्टाचार आणि दादागिरीतून भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी मोठी प्रॉपर्टी केल्याचा आरोप पिंपरीगावातील सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल नाव न घेता केला होता.त्यावर महेशदादांनी आज मोठा पलटवार केला.ज्यांच्यावर ७० हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप,मुलावरही जमिनी लुबाडल्याचा आरोप त्यांनी यावर बोलावं,असा टोला लगावला. नैराश्येतून ते हे आरोप करीत असल्याचे ते म्हणाले.माईक समोर आल्यावर एखाद्याविषयी वाईट बोलल्याशिवाय त्यांचं भाषणच संपत नाही,चांगलं बोलताच येत नाही,अशी कोपरखळी मारली.यातून या दोन दादांतील शीतयुध्दाने आता वेगळेच वळण घेतल्याचे पहायला मिळाले आहे.

mostbet

ज्यांना पिंपरी महापालिकेत १२८ जागी उमेदवार देता आले नाहीत,ही त्यांची शोकांतिका असून त्याचा विचार त्यांनी करावा,असा सणसणीत प्रहार पैलवान आमदार लांडगेंनी अजितदादांवर मिडिया शी बोलताना आज केला.ते भाजपमध्ये का आले असा बोचरा व नेमका सवाल त्यांनी केला.मी त्याला नगरसेवक केलं,स्थायी समिती अध्यक्षपद दिलं,या अजितदादांच्या वक्तव्याचा समाचार घेताना कोणी कोणाला मोठं करत नसतं,असं प्रत्युत्तर महेशदादांनी दिलं.ते राष्ट्रीय नेते असल्याचे उपहासाने म्हणत त्यांनी विकासाच्या मुद्यावर बोलावं,अशी विनंती त्यांनी केली.कारण मला विकासाचं राजकारण करायचंय,आरोपाचं नाही,असे ते म्हणाले.पाच वर्षात काय केलं,अशी विचारणा ते करतात,त्यांना समाविष्ट गावांचा विकास दिसत नाही का,पोलिस आयुक्तालयाची स्थापना नजरेत येत नाही का,अशी विचारणा महेशदादांनी केली.त्यांनी स्थानिक नेतृत्व मोठं होऊ दिलं नाही,असा दावाही केला.
त्यांच्यावर बोलताना वाईट वाटते आहे,असे महेशदादा म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीधर्म पाळायला सांगितला असल्याने मी आऱोप करीत नाही,असे महेशदादांनी स्पष्ट केलं. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावरच झाली पाहिजे,असे ते म्हणाले.माझी दादागिरी ही धर्माविरुद्ध काम करणाऱ्यांविरुद्ध,लेकी-
बाळींवर वाईट नजर ठेवणाऱ्यांविरुद्ध,आतंकवादी कारवाया करणाऱ्यांविरोधात आणि सर्वसामान्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आहे,असे ते म्हणाले.चिखलीत बांगलादेशी घुसखोर होते,म्हणून तेथे केलेली अतिक्रमण कारवाई योग्य होती,याचा त्यांनी पुनरुच्चार केला.कुत्र्यांच्या नसबंदीत घोटाळा केल्याच्या आरोपावर बारामतीसह इतर ठिकाणी अशी शस्त्रक्रिया केल्यानंतर कुत्री चावत नाहीत का,अशी उलट विचारणा त्यांनी केली.तसेच नावानिशी आरोप करीत ते सिद्ध करावेत,असे आव्हान त्यांनी दिले.