त्यामुळे पिं.चि.मनपा निवडणुकीत दादा विरुद्ध दादा संघर्षाला आता भाचे जावई विरुद्ध मामे सासरे असे स्वरुप प्राप्त झाले
उत्तम कुटे
पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना मोठी राजकीय घडामोड़ आज घडली. राष्ट्रवादीचे या निवडणुकीचे प्रचारप्रमुख अचानक बदलण्यात आले.नाना काटे हे आतापर्यंत हे पद सांभाळत होते.आता ही जबाबदारी विलास लांडे यांच्याकडे देण्यात आली.यानिमित्त पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी लांडेवर मोठा विश्वास दाखवत त्यांना महापालिकेत पक्षाची पुन्हा सत्ता आणण्याची जबाबदारी दिली.याव्दारे शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भोसरीकडे हे पद गेले.
२०१७ ला हातातून निसटलेली पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता पुन्हा मिळविण्याचा चंग राष्ट्रवादीने यावेळी केला असून त्यादृष्टीने जोरदार तयारी त्यांची सुरु आहे.त्याचाच एक भाग म्हणून या निवडणुकीचे प्रमुख म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते,भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांची आज पक्षाने नेमणूक केली.दुसरीकडे त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे शहराचे झंझावाती दौरै सुरुच आहेत.
चिंचवड विधानसभा लढलेले महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी १४ नोव्हेंबर रोजी प्रचारप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती.मात्र,प्रचार शेवटच्या टप्यात पोचला असताना ती आज अचानक काढून घेण्यात आली.त्य़ाऐवजी ती लाडेंना दिली गेली.खरं,तर हे यापूर्वीच व्हायला पाहिजे होती,असा सूर या नियुक्तीवर शहर राष्ट्रवादीत दिसला.कारण नाना काटे,त्यांच्या पत्नी शीतल असे दोघेही निवडणूक पुन्हा शिवार गार्डन, कापसे लॉन,पिंपळे सौदागर,रोझलॅण्ड या प्रभाग २८ मधून नि़व़डणूक लढवित आहेत.नाना काटे हे त्यांच्या पॅनेलचे प्रमुख आहेत.तर,त्यांच्यासमोर त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी भाजपचे पॅनेल असून त्याचे नेतृत्व त्यांचे शहराध्यक्ष शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे यांच्याकडे आहे.गेल्यावेळी या प्रभागात या दोन्ही पक्षांना फिफ्टी-फिफ्टी यश मिळाले.त्यांचे दोन-दोन नगरसेवक निवडून आले.पण,यावेळी पूर्ण पॅनेल निवडून आणण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.त्यातून दोघांच्या दृष्टीने या प्रभागातील लढत ही मोठी प्रतिष्ठेची झाली आहे.त्यामुळे नाना काटे यांना अधिक लक्ष तेथे द्यावे लागते आहे.परिणामी प्रचारप्रमुख म्हणून शहरात इतरत्र दूर्लक्ष होण्याची शक्यता गृहित धरून राष्ट्रवादीने त्यांना प्रचाररप्रमुख या जबाबदारीतून आज मोकळे केले.
पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवून पुन्हा पालिकेत घड्याळाचा गजर करू,अशी प्रतिक्रिया नाना काटे यांनी प्रचारप्रमुख पदी निुयुक्ती झाल्यावर दिली होती.तर,शहर भ्रष्टाचार मुक्त झाले पाहिजे,अशी प्रतिक्रिया नवनियुक्त प्रचारप्रमुख लांडे यांनी आपल्या नेमणुकीनंतर आपला आवाज ला दिली.त्यातून त्यांनी आपल्या प्रचाराची दिशा काय राहील,हे स्पष्ट केले.अजित पवार यांनीही भाजपच्या गेल्या टर्ममधील मोठ्या भ्रष्टाचाराचा मुद्दाच मुख्य प्रचाराचा केला आहे.तोच कित्ता गिरवणार असल्याचे लांडे यांनीही सूचित केले.
राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले भाजप व राष्ट्रवादी पिंपरी महापालिकेत मात्र स्वतंत्र लढत असल्याने येथे हा संघर्ष हा तथा लढत ही त्यांच्या दोन दादा तथा कारभारी म्हणजे अजितदादा व भाजपचे भोसरीचे पैलवान आमदार महेशदादा लांडगे यांच्यातच होत आहे.त्यांच्यात गेल्या काही कालावधीपासून मोठे कोल्डवॉर ही सुरु असून अजितदादांनी महेशदादांवर नुकत्याच केलेल्या भ्रष्टाचाराच्या मोठ्या आरोपामुळे ते आणखी तीव्र झाले आहे.त्यात आता महेशदादा यांचे मामेसासरे विलास लांडे यांना राष्ट्रवादीचे प्रचारप्रमुख केल्याने उद्योगनगरीतील या लढतीला दादा विरुद्ध दादानंतर आता मामे सासरे विरुद्ध भाचेजावई असे स्वरुपही प्राप्त झाले.तसेच याव्दारे राष्ट्रवादीने महेशदादांची दुहेरी कोंडी करण्याचा प्रयत्नही केला आहे.तो कितपत यशस्वी झाला हे येत्या १६ तारखेला निकालानंतरच कळणार आहे.

