अखेर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या मध्यस्थीला आले यश…

नाराज इच्छुक माजी महापौर आर.एस.कुमार, सलीम शिकलगार प्रचारात उतरल्याने प्रभाग 15मध्ये भाजपचे पारडे झाले जड

प्रतिनिधी
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका निव़़डणुकीत प्रभाग १५ मधील नाराज इच्छूक माजी महापौर आर. एस. कुमार तसेच सलीम शिकलगार यांची नाराजी दूर करण्यात भाजयुमो चे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांना अखेर य़श आले.हे दोघे मंगळवारी (ता.६) माजी उपमहापौर राजु मिसाळ,माजी उपमहापौर शैलजा मोरे,माजी नगरसेवक अमित गावडे,माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांच्या प्रचारात उतरल्याने या प्रभागात भाजपचे पारडे जड झाले.प्रभाग १५ मधील भाजप उमेदवारांच्या पॅनेलच्या प्रचाराला अनुप मोरे यांच्या नेतृत्वात आता चांगलाच वेग आला आहे.

mostbet

प्रभाग १५ मधील भाजप उमेदवार राजू मिसाळ,अमित गावडे,शैलजा मोरे आणि शर्मिला बाबर यांनी सायंकाळी भव्य पदयात्रा काढून प्रचाराला आणखी गती दिली.मतदारांशी संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले.ही पदयात्रा LIG कॉलनी,सावरकर भवन रोड आणि बिग इंडिया चौक परिसरात काढण्यात आली.तीत मोठ्या नागरिक, महिला,युवक तसेच भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी सर्व उमेदवारांनी LIG कॉलनीतील हनुमान मंदिर व गणपती मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली.नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत शुभेच्छा दिल्या.विकासकामांसाठी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.या पदयात्रेत आर.एस.कुमार आणि सलीम शिकलगर यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.कारण ते दोघेही या प्रभागातून इच्छूक होते.तरीही नाराज न होता ते प्रचारात सामील झाले.चारही उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला.त्यांचा सहभाग व पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक १५ मधील भाजप उमेदवारांची ताकद अधिक वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

स्थानिक प्रश्न,नागरी सुविधा आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाबाबत नागरिकांनी आपली मते उमेदवारांसमोर यावेळी मांडली.त्यावर येत्या काळात या समस्या सोडवून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचा शब्द उमेदवारांनी दिला.या पदयात्रेमुळे प्रभागातील निवडणुकीचे वातावरण तापले असून नागरिकांचा पाठिंबा भाजप उमेदवारांना मिळत असल्याचे चित्र दिसून आले.