कारवाई होत नसूनही एनसी मध्ये ती करण्याची भीती दाखवून हवालदाराने मागितली पाच हजाराची लाच

प्रतिनिधी
पिंपरीःअदखलपात्र म्हणजे एनसी च्या गुन्ह्यात पोलिसांना कारवाई करता येत नाही.त्यातील आऱोपीला ते फक्त समज देऊ शकतात.तरीही अशा दाखल एनसी मध्ये एका भाजी विक्रेत्याला कारवाई करण्याची भीती दाखवून पुणे ग्रामीणमधील सासवड पोलिस ठाण्यातील हवालदार विकास लक्ष्मण ओमासे (वय ३९,रा.रुम नं.१४,दुसरा मजला,आनंदबाग सोसायटी,सोनारी रोड,सासवड,पुणे) याने पाच हजाराची लाच मागितल्याचा प्रकार घडला. त्याबाबत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्याच्याविरुद्ध कारवाई करीत त्याच्याच सासवड पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा मंगळवारी (ता.६)त्याच्याविरुद्ध दाखल केला.त्यात त्याला ताब्यात घेतले.

सुरवातीला हवालदार ओमासे याने ३९ वर्षीय पुरुष तक्रारदारांकडे दहा हजार रुपये लाच मागितली होती.नंतर पाच हजारावर तडजोड केली.सदर तक्रारदार व त्यांच्या वडिलांविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात एनसी दाखल झाली होती.त्यात पोलिसांना कारवाई करता येत नाही.फक्त आऱोपीला समज ते देऊ शकतात.कारवाईसाठी न्यायालयाची परवानगी त्यांना लागते.तरीही ओमासे याने कारवाई करण्याची भीती दाखवून मदत करण्याकरिता लाच मागितली होती,हे विशेष.पुणे एसीबी च्या पोलिस निरीक्षक आसावरी शेडगे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

mostbet