निम्मे मतदान होईल का असे दुपारपर्यंत वाटताना संध्याकाळी ते झाले ६८ टक्के
उत्तम कुटे
पिंपरीःस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पहिल्या टप्यात नगरपरिषदा,नगरपंचायतीसाठी मंगळवारी (ता.२) मतदान झाले.पुणे जिल्ह्यात बारामती व फुरसुंगीचा अपवाद वगळता इतर १५ ठिकाणी दुपारपर्यंत त्याचा वेग मंद होता.मात्र,गत विधानसभा निवडणुकीप्रमाणे शेवटच्या टप्यात ते अचानक वाढले.साडेपाच वाजता ते ६८ टक्के झाले. हा वाढलेला टक्का महायुतीला विधानसभेप्रमाणे लाभदायक ठरतो का,याकरिता २३ तारखेची वाट पहावी लागणार आहे.
सकाळी थंडीमुळे साडेदहा वाजेपर्यंत तीन तासांत मतदान खूप कमी झाले.दुपारी त्यात वाढ झाली.त्यामुळे साडेतीनपर्यंत ते निम्मे झाले.मात्र,शेवटच्या दोन तासांत त्याला मोठा वेग आला.त्यामुळे साडेपाच वाजता ते जवळजवळ सत्तरीत गेले. ६९.०१ एवढा त्याचा टक्का राहिला.सर्वाधिक ते इंदापूरला 79.89% ,तर,सर्वात कमी ते मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे येथे 49.24% झाले.सर्वाधिक मतदान झालेल्या इंदापूरला इतर चार म्हणजे तृतीयपंथीय़ांनी मतदानाचा आपला हक्क बजावला. त्यानंतर आळंदी (तीन) वगळता इतर १३ ठिकाणी इतर मतदान झालेच नाही.
सासवड
एकूण मतदान 22557
पुरुष 11412
महिला 11145
पुरुष टक्केवारी 67.86
महिला टक्केवारी 66.19
एकूण टक्केवारी 67.02
दौंड
पुरुष 15302
महिला 14650
एकूण 29952
एकूण टक्केवारी 59.32%
इंदापूर
पुरुष 9750
महिला 10083
इतर 4
एकूण 19837
एकूण टक्केवारी 79.89%
जुन्नर
पुरुष 8325
महिला 7740
एकूण 16065
एकूण टक्केवारी 68.39%
तळेगाव दाभाडे
पुरुष 16555
महिला 15291
एकूण 31846
एकूण टक्केवारी 49.24%
भोर
पुरुष 6428
महिला 6437
एकूण 12865
एकूण टक्केवारी 76.96%
चाकण
पुरुष 12729
महिला 11876
एकूण 24605
एकूण टक्केवारी74.28%
आळंदी
पुरुष 10168
महिला 8994
इतर 3
एकूण 19165
एकूण टक्केवारी 75.66%
राजगुरूनगर
पुरुष 9176
महिला 8594
एकूण 17770
एकूण टक्केवारी 68.87%
लोणावळा
पुरुष 17162
महिला 17349
एकूण 34511
एकूण टक्केवारी 71.34%
शिरूर
पुरुष 11762
महिला 11710
एकूण 23472
एकूण टक्केवारी 71.14
