नगरपरिषद,नगरपंचायतीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज..

4 लाख 51 हजार 25 मतदारांसाठी पुणे जिल्ह्यात 524 मतदान केंद्र प्रतिनिधीपिंपरी:स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पहिल्या टप्यात राज्यामध्ये उद्या नगरपरिषदा, नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे.त्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सांगितले.पुणे जिल्ह्यातील 4 लाख 51 हजार 25 मतदारांसाठी 524 मतदान केंद्र असल्याची माहिती त्यांनी दिली.शांततेत मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.त्याकरिता…

4 लाख 51 हजार 25 मतदारांसाठी पुणे जिल्ह्यात 524 मतदान केंद्र

प्रतिनिधी
पिंपरी:स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पहिल्या टप्यात राज्यामध्ये उद्या नगरपरिषदा, नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे.त्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सांगितले.पुणे जिल्ह्यातील 4 लाख 51 हजार 25 मतदारांसाठी 524 मतदान केंद्र असल्याची माहिती त्यांनी दिली.शांततेत मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.त्याकरिता उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 3 नगरपंचायतीत 2 लाख 27 हजार 142 पुरुष,तर 2 लाख 23 हजार 407 महिला व इतर म्हणजे तृतीयपंथी 23 मतदार आहेत. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानापुर्वी मॉक पोल घेतला जाणार आहे.मतदानाच्या दिवशी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत,असे दुडी यांनी सांगितले.जिल्ह्यात एकूण 13 पिंक मतदान केंद्रे असून तेथील सर्व अधिकारी कर्मचारी महिला आहेत.तर,15 जागी आदर्श मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, आदी अधिकारी, कर्मचारी मिळून एकूण 3 हजार 21 जण असणार आहेत.दरम्यान,12 नगरपरिषदा,3 नगरपंचायतीत अध्यक्ष पदाकरिता 76 आणि नगरसेवक पदासाठी 955 उमेदवार रिंगणात आहेत.