प्रतिनिधी
पिंपरीःसामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल आऱपीआय़ चे (आठवले गट) पिंपरी विधानसभा अध्यक्ष दादा शिरोळे यांना स्टार महाराष्ट्र हा राज्यस्तरीय पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आऱपीआय चे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते नुकताच मुंबई येथे देण्यात आला.वरद विनायक समर्थ बहूउद्देशीय़ संस्था आणि स्टार महाराष्ट्र साप्ताहिक यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना दरवर्षी तो दिला जातो.प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी असे त्याचे स्वरुप आहे. त्याचे हे १४ वे वर्ष आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला झी 24 तास न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक कमलेश सुतार,महाराष्ट्र टाईम्स चे सौरभ शर्मा, टाईम्स ऑफ इंडिया चे वझीउद्दीन,लोकशाहीर नंदेश उमप,अभिनेत्री स्विटी छाब्रिया आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. रविंद्र नाट्य मंदिरात तो झाला.हेमंत रणपिसे यांनी त्याचे आयोजन केले होते.

