प्रचाराच्या आज थंडावणाऱ्या तोफा आता काही जागी १८ तारखेपर्यंत धडाडणार
उत्तम कुटे
पिंपरीःराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पहिल्या टप्यात २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी उद्या मतदान असताना अचानक त्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासह अनेक जागांवरील निवडणूक ही राज्य निवडणूक आयोगाने आता २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली.त्यामुळे शेवटच्या टप्यात प्रचार रंगात आलेला असताना ती स्थगित झालेल्या ठिकाणी राजकय नेते,उमेदवार व कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाला.मात्र,प्रचाराचा कमी कालावधी मिळाल्याने तो पूर्ण न करू शकलेल्या अनेक उमेदवारांना मोठा दिलासाही मिळाला.दरम्यान,आज रात्री थंडावणाऱ्या प्रचाराचा तोफा निवडणूक पुढे गेलेल्या ठिकाणी १८ तारखेपर्यंत,तरी धडा़डणारच आहेत.
पुणे जिल्हयातील १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकाचा कार्यक्रम ४ नोव्हेंबरला जाहीर झाला होता. त्यातील बारामती,फुरसुंगी उरुळी देवाची येथील पूर्ण म्हणजे नगराध्यक्षपदासह तेथील सर्व नगरसेवकांची निवडणूक स्थगित केली गेली आहे.तर,मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे,लोणावळा व दौंड, सासवड नगरपरिषदांतील दहा जागांवरील ती आता २० जानेवारीपर्यंत पुढे गेली आहे.त्यामुळे तेथे आता उद्या मतदान आणि परवा निकाल येणार नाही.तेथे मतदान हे २० तारखेला व रिझल्ट २१ ला येणार आहे.दरम्यान,जाहीर केलेल्या या निवडणुकीतील आयोगाच्या सावळागोंधळाबद्दल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाराजी व्यक्त केली आहे.
जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार त्या न घेता म्हणजे निवडणुकीचाी प्रक्रिया पूर्ण न करता काही तरतुदींना फाटा देत घाईघाईने त्या उरकरण्याचा प्रयत्न काही निवडणूक अधिकाऱ्यांनी केल्यामुळे आयोगावर ही नामुष्कीची पाळी आली.काही अधिकाऱ्यांनी माघारीसाठी पुरेसा वेळ न देताच घाईत निवडणूक चिन्ह वाटप केले.परिणामी त्याला आव्हान देण्यात आले. त्यातून ती न्यायालयीन कचाट्यात सापडली.त्याची परिणती जाहीर केलेल्या अनेक जागी निवडणुका पुढे ढकलण्याची पाळी आयोगावर आली.त्यातून अगोदरच विरोधकांच्या रडारवर आलेल्या आयोगाचे पुन्हा मोठे हसे झाले.बारामती,फुरसुंगी येथील नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांसह तळेगाव दाभाडे येथील प्रभाग क्र.२ (अ), ७(अ), ७(ब), ८ (अ), ८(ब) व १० (ब),लोणावळ्यातील ५ (ब) व १० (अ),दौंड येथील ९ (अ),तर सासवडची ११(अ)अशा चार नगरपरिषदांतील दहा जागांची निवडणूक पुढे गेली आहे.तेथे आता उद्या नाही,तर २० तारखेल मतदान होऊन दुसऱ्या दिवशी निकाल लागणार आहे.त्यासाठी तेथे ४ तारखेला निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
