मावळात राष्ट्रवादी काँग्रेसचा शक्तीप्रदर्शन मेळावा संपन्न

आमदार सुनील शेळके यांना पक्षाच्या बळकटीकरणाला नवा वेग येणार असल्याचा विश्वास

पिंपरी (दि. 14) : मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा भव्य मेळावा घेण्यात आला.या मेळाव्याच्या माध्यमातून पक्ष संघटन बळकट करणे, आगामी निवडणूक धोरण आखणे आणि जनतेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका पोहोचवणे या दृष्टीने चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

मेळाव्याला कार्यकर्त्यांनी उत्सपूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.दरम्यान या कार्यक्रमात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संघटनशक्ती वाढवण्याचे आवाहन करण्यात आले.मावळच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निर्धार व्यक्त केला.

या मेळाव्यास मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. २० ऑक्टोबरला अजित पवार यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे नगरपरिषद नूतन इमारत उदघाटन होणार असल्याने कार्यक्रमाच्या नियोजनाची चर्चाही या बैठकीत करण्यात आली. हा कार्यक्रम मावळ तालुक्यातील राजकीय आणि विकासात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे या मेळाव्यातून सांगण्यात आले आहे.