सीपीं नी कारवाईत करीत त्यांची बदली नियंत्रण कक्ष या दुय्यम ठिकाणीत केली
उत्तम कुटे
पिंपरीःलाचखोरीचा अजब नमुना काल पुण्यात समोर आला.घरमालक व त्याच्या भाडेकरूविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा कोंढवा पोलिसांनी दाखल केला होता. त्यात अटक न करता मदत करण्यासाठी या पोलिस ठाण्यातील शिपाई सोमनाथ बापू महारनवर (वय ३४,रा.फ्लॅट क्रमांक ४,ओम नमो रेसिडेन्सी,शेवाळवाडी, ता.हवेली जि. पुणे)याने आरोपी दहा हजार रुपयांची लाच मागून त्यातील पाच हजार रुपये घरमालकाकडून घेतले. पण, त्याचा बभ्रा झाल्याने त्याने घेतलेली लाच परत द्यायचे ठरवले.पण,त्याची रक्कम वीजचोरीच्या गुन्ह्यातील दुसरा आरोपी भाडेकरूला आपल्या घरमालकाला देण्यास त्याने सांगितले.पोलिस ठाण्यासमोर ती काल देण्यात आली.या पोलिस शिपायाच्या लाचखोरीची दखल घेत पोलिस आयुक्त (सीपी)अमितेशकुमार यांनी कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांची लगेचच काल रात्रीच तडकाफडकी पोलिस नियंत्रण कक्ष (कंट्रोल रुम)या दुय्यम व शिक्षा समजल्या जाणाऱ्या ठिकाणी बदली केली.
यापूर्वी २०२२ मध्ये कोंढवा पोलिस ठाण्यावरील दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक (त्यात एक महिला) हे लाचखोरीत अडकल्याने तत्कालीन सीपी अमिताभ गुप्ता यांनी पोलिस ठाण्याचे त्यावेळचे प्रमुख सरदार पाटील यांना काही दिवसांसाठी कंट्रोल रुमला बदलीवर पाठवले होते.त्यानंतर त्यांनी अशीच कारवाई चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवरही अशाच लाचखोरीच्या प्रकरणात केली होती. त्यांचा हा कित्ता विद्यमान सीपींनी काल गिरवला.दरम्यान,लाचखोर पोलिस महारनवर याला दोन दिवसांची पोलिस कोठडी पुण्यातील विशेष न्यायालयाने आज सुनावली.त्यामुळे त्याला सीपी हे थेट घरचा रस्ता दाखविण्याची (निलंबन)दाट शक्यता आहे.त्याला लाच घेण्यास उद्युक्त केले म्हणून या गुन्ह्यात युवराज कृष्णा फरांदे (वय ५९, रा. स्वप्नपूर्ती बंगला,वृदांवन सोसायटी ऊरुळीकांचन,पुणे )या सेवानिवृत्त उपनिरीक्षकाला (फौजदार) सुद्धा एसीबी ने आरोपी केले आहे. दरम्यान,पुणे सीपींच्या या कारवाईचे अनुकरण पिंपरी-चिंचवड सीपी विनयकुमार चौबे यांनी केले,तर शहर पोलिस दलातील भ्रष्टाचारालाही आळा बसणार आहे.
महारनवर याने लाचेतील राहिलेले पाच हजार रुपये ४४ वर्षीय वीज चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी भाडेकरूला त्याच्या घरमालकाला देण्यास सा्ंगितले.त्यामुळे या भाडेकरूने एसीबी कडे तक्रार केली .त्यावर या विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त नीता मिसाळ या्ंनी काल कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर भाडेकरूकडून घरमालकाला पाच हजार रूपये घेताना महारनवर समक्ष पकडले.परंतू,घरमालकाला त्यांनी लाचखोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करता ती द्यायला लावणारा व यापूर्वी ती घेतलेल्या महारनवरला केले.

