फिनोलेक्स चौकाचे नाव बदलून “IAS शेखर सिंह किंग – सिंग इज किंग चौक” करावे’ असा प्रस्ताव आयुक्तांकडे
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी):
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी आयुक्त व सध्याचे नाशिक कुंभमेळा प्रमुख IAS शेखर सिंह यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरीच्या स्मरणार्थ त्यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात यावी, अशी विनोदी शैलीतील मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे शहर प्रवक्ता माधव बाळकृष्ण धनवे पाटील यांनी केली आहे.
त्यांनी नव्याने नियुक्त झालेल्या महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठवलेल्या पत्राद्वारे ही मागणी केली असून, मोसातील प्रसिद्ध “फिनोलेक्स चौकातील लाल घोडा हटवून” त्या ठिकाणी IAS शेखर सिंह यांचा पुतळा बसवावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच चौकाचे नाव “IAS शेखर सिंह किंग – सिंग इज किंग चौक” असे ठेवावे, असा प्रस्तावही त्यांनी दिला आहे.
धनवे पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की,
गेल्या तीन वर्षांत शेखर सिंह यांनी ‘न भूतो न भविष्यती’ अशी कामगिरी केली आहे. शहरावर वीस हजार कोटींचे कर्ज असले तरी विकास (भाजपचा) झाला आहे. शहरातील लोकांना त्यांनी पिसाळलेल्या कुत्र्यांपासून आणि भिक्षेकऱ्यांपासून मुक्ती दिली नाही, पण मोठमोठ्या टेंडरांमधून ‘हिमालयाएवढी कामे’ केली.
त्यांनी पुढे विनोदी शैलीत असेही म्हटले की,
“चिखलीतील हजारो व्यवसायिकांच्या स्वप्नांवर बुलडोझर चालवून पिंपरी चिंचवडचा एक अदानी तयार झाला — हेही सिंह साहेबांचे योगदानच म्हणावे लागेल. त्यामुळे त्यांच्यावर शहरवासीय बेहद खुश आहेत.पत्राच्या शेवटी धनवे पाटील यांनी हर्डीकर यांना उद्देशून म्हटले आहे की,
IAS शेखर सिंह यांच्या कार्यातून देशभरातील ६८७७ आयएएस अधिकाऱ्यांना प्रेरणा मिळेल. त्यामुळे चौकाचे नामकरण व पुतळा बसवण्याचा निर्णय घ्यावा.

