मतदारांना खुश ठेवण्यासाठी काही भावी उमेदवार यांनी केलेला खर्च वाया गेला, आरक्षण जाहीर होताच काही इच्छूक निराश झाले अशी काहीशी परिस्थिती आंबेगाव तालुक्यात पाहाव्यास मिळत आहे.
सदानंद शेवाळे आंबेगाव
दि.१३\१०\२०२५
मंचर : पुणे जिल्हा परिषद व पंचायत मतदारसंघ (गट व गण) आरक्षणाची सोडत आज (ता.१३)काढण्यात आली. जि.प.ची ती पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात,तर ता.पं.ची ती सबंधित तालुक्याच्या ठिकाणी काढली गेली.त्यासाठी अनेकजण हे देव पाण्यात ठेवून बसले होते. त्यातील काहींच्या मनासारखी ती निघाल्याने त्यांना तो पावला,तर विरोधात हा कौल गेलेल्यांना अनेकांना निराश व्हावे लागले. दरम्यान,या लॉटरीनंतर जि.प. व ता.पं. निवडणुकीकरिता इच्छूकांना मैदानं (मतदारसंघ) मिळाल्याने तेथे त्यांचा सरावाचा (तयारी)मार्ग आता मोकळा झाला आहे.स्थानिक च्या पहिल्या टप्यात महापालिका निवडणुकीपूर्वी पुढील महिन्यात वा डिसेंबरमध्ये ता.पं. व जि.प.निवडणूक होण्याची शक्यता आहे.
गट व गणाची सोडत निघाल्याने जि.प. व ता.पं.निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील प्रशासनाची तयारी पूर्ण झाली.आता ती जाहीर होण्य़ाची प्रतिक्षा असून दिवाळीनंतर तिचा निवडणूक कार्यक्रम तथा प्रक्रिया घोषित होऊ शकते.यापूर्वी राज्यातती आपल्या मनासारखी निघावी म्हणून माजी ता.पं.सदस्यांसह इच्छूक देव पाण्यात घालून बसले होते. त्यांच्यापैकी काहींची इच्छा पूर्ण झाली,तर अनेकांना निराश व्हावे लागल्याचे सोडतीनंतर दिसले.

आंबेगाव तालुका पंचायत समिती गण
आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण
1)अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गट ओबीसी साठी राखीव 2)पारगाव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण
3)कळंब जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला राखीव
4)घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला राखीव
5)शिनोली बोरघर जिल्हा परिषद गट अनुसूचित जमातीअसे असून जिल्हा परिषद गटाचे 1)बोरघर शिनोली जि. प. गट :अनु. जमाती महिला 2)घोडेगाव पेठ जि. प. गट :सर्वसाधारण महिला 3)अवसरी पिंपळगाव जि. प. गट: ना. मा. प्र.पुरुष 4)कळंब चांडोली बुद्रुक जि. प. गट :सर्वसाधारण महिला 5)पारगाव जि. प. गट :सर्वसाधारण असे जाहीर करण्यात आले आहे.

