पिंपरी, (प्रतिनिधी) : विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पिंपरी चिंचवड करांनी तब्बल 10 हजार नवीन वाहनांची नोंदणी केली आहे. नवरात्रीत 10 हजार वाहनांची नोंदणी झाली तर दसऱ्याच्या दिवशी 776 वाहनांची नोंदणी झाली आहे. नवीन वाहनांच्या नोंदणीमुळे यंदा आरटीओ च्या तिजोरीत तब्बल 69 कोटी 94 लाखाचा महसूल जमा झाला आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळात शहरातील विविध वाहनांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. नऊ दिवसात बुकिंग केलेल्या चार चाकी वाहने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घरी नेण्यात आली. मागील वर्षी 4295 दुचाकी वाहनांची तर 2434 यांची विक्री झाली होती.या वर्षी त्यात वाढ होऊन दुचाकी 5188,तर चाचाकी 3907 येवढ्या वाहनांची विक्री झाली आहे.
यंदा ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्रमाणात पसंती देण्यात आल्याचे समोर आले आहे. पारंपारिक पेट्रोल व डिझेलवर चालणारी वाहने कार्बनडायऑक्सइड आणि पर्यावरणासाठी घातक घटक हवेत सोडतात आणि त्यामुळे प्रदूषण वाढते. या बाबतीत आता नागरिकही जागृत झाल्याने इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे दिसत आहे.

