पिंपरी, (प्रतिनिधी) : गेल्या अकरा वर्षापासून केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांनी संघाने दसऱ्यानिमित्त काढलेल्या संचलनामध्ये सहभाग घेतला असल्याचे दिसून आले. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसमधून भाजपात आलेल्या नेत्यांना संघाचे वेड लागले असल्याचे दिसून येत आहे.
सत्तेमध्ये असेल तरच कामे होतात, हे राजकीय नेत्यांना माहीत आहे. गेल्या अकरा वर्षापासून केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक नेते मंडळी भाजपमध्ये दाखल झाली असून ते आपले कामे करून घेत आहेत.या वर्षी संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत,या पार्श्वभूमीवर देशात अनेक टिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमास उपस्थित राहून संघाच्या नाण्याचे व टपाल तिकिटाचे अनावरण केले आहे. देशात अनेक गावात संघाकडून दसरा सणानिमित्त संचलन करण्यात आले होते. या संचलनामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अनेक नेते पांढरा शर्ट व खाकी पँट घालून सहभागी झाले असल्याचे दिसून आले. यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांना संघाचे वेड लागल्याचे दिसून येत आहे.

