पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा उपक्रम

ललित म्हसेकर यांनी दिला मराठवाड्यातील पूरग्रस्तांना आधार

पिंपरी, (प्रतिनिधी),(दि.02) : आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वतीने ललित जालिंदर म्हसेकर व म्हसेकर कुटुंबाकडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी १११ किलो उत्तम दर्जाचा तांदूळ देण्यात आला आहे.GDC IAS Academy आणि मधुबन मित्र मंडळ ट्रस्ट यांच्याकडे सुपूर्त तांदूळ त्यांनी सुपूर्द केला आहे.

मराठवाड्यतील बांधवांसाठी मदत जमा करणाऱ्या गणेश चव्हाण यांनी याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.तुम्ही केलेली मदत मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी अत्यंत मोलाची असल्याचे त्यांनी सांगितले.आमच्यासाठी हे तुमचे योगदान खूप मोठे असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.यावेळी ललित म्हसेकर यांनी देखील मदत जमा करणाऱ्या GDC IAS Academy व मधुबन मित्र मंडळ यांचे या कामाबद्दल कौतुक केले आहे.

यावेळी स्व.आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमदार शंकरभाऊ जगताप यांनी आम्हाला लोकांच्या सुख दुःखात सहभागी व्हा, त्यांचा आधार बना,दुःख वाटून घ्या अशी शिकवण दिल्याचे सांगितले, त्या प्रमाणे आम्ही त्यांचे विचार जपण्याचे प्रयत्न करत असल्याचेही श्री म्हसेकरानी सांगितले.मदतरूपी खारीचा वाटा उचलत असताना आत्मिक समाधान वाटते अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.