पिंपळे सौदागर येथील घटना
पिंपरी, (प्रतिनिधी) : वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्टसाठी एकत्र आलेल्या मित्रांनी एका मित्रावार चाकूने वार करत खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि. 29) रात्री घडली आहे.कॅस्ट्रेलिया सोसायटी समोर पिंपळे सौदागर येथे ही घटना घडली असून तीन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जखमी व्यक्तीचे नाव सुशील ढवळे (वय 40 पिंपळे सौदागर )असून त्यांच्या पत्नीने पत्नीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार नंदू सुदाम गायकवाड (वय 48 महाळुंगे), प्रीतम चंद्रकांत करांडे (वय 54 पिंपळे गुरव), सोमेश्वर संभाजी कांबळे (वय 33 आळंदी) या तिघांविरोधात फिर्याद दिली आहे.
सुशील आणि मारहाण करणारे मित्र आहेत, ते सोमेश्वर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोमवारी रात्री पिंपळे सौदागर येथे एकत्र आले होते.वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्यात वाद झाला. या वेळी तिघांनी त्यांना मारहाण करून चाकूने वार केले. त्यात छातीवर,पायावर आणि डाव्या दंडावर वार करून गंभीर दुखापत केली आहे.

