शिरूर : दि. ०१/१०/२०२५.
बातमी : रवींद्र खुडे, विभागीय संपादक.
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील रामलिंग महिला उन्नती बहु उद्देशीय्य सामाजिक संस्था व स्व. गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच, यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सव दरवर्षी मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यामध्ये ९ दिवस विविध सामाजिक उपक्रम व स्पर्धा घेण्यात येतात. यंदाही अशा स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचे बक्षीस वितरण हे, महाराष्ट्रातील श्रीमंत सरदार घराणे सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज श्री कुणाल मालुसरे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज श्री राजेंद्र उर्फ संग्रामसिंह मोहिते पाटील, वीरमाता धाराऊ यांचे थेट वंशज श्री अमित गाडे पाटील, नागपूरकर मूळ शाखा वंशज श्री सचिन भोसले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवदुर्गा पुरस्कार व बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी गृहिणी क्षेत्रात सुरेखा गोरक्षनाथ दसगुडे, शैक्षणिक क्षेत्रात राजश्री अरुणकुमार मोटे, सामाजिक क्षेत्रात मीना गवारे, धार्मिक क्षेत्रात वर्षा नाईक, वैद्यकीय क्षेत्रात डॉ शिल्पा बढे, औद्योगिक क्षेत्रात रेखा पवार, पोलिस क्षेत्रात शोभा ससे, राजकीय क्षेत्रात रोहिणी बनकर, पत्रकारिता क्षेत्रात मनीषा राजगुरू यांना यंदाच्या नवदुर्गा २०२५ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

होम मिनिस्टर खेळातील मानाच्या पहिल्या क्रमांकाची पैठणी स्नेहल कर्डिले, दुसऱ्या क्रमांकाची पैठणी पूजा दौंडकर, तिसऱ्या क्रमांकाची पैठणी कविता गोरे यांना सन्मानित करण्यात आले. डान्स स्पर्धेतील प्रथम क्रमांक सप्तमी गणेश घावटे पाटील, द्वितीय क्रमांक भावेश सांगळे, तृतीय क्रमांक अन्वी लंगडे व सान्वी गोरे यांनाही सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिरूर येथील कल्याणी सखी महिला ग्रुपचे स्त्रीभ्रूण हत्या व कायदे यावर ॲड भाग्यश्री बोरा व पथकाचे पथनाट्य झाले. प्रेक्षकांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमासाठी शिरूर येथील ओम शांती केंद्राच्या शंकुंतला दिदी, गौतम घावटे पाटील, शामकांत वर्पे, शरद पवार, मा. ऊपसरपंच यशवंत कर्डिले, शिवाजी दसगुडे, ग्रा. पं. सदस्य केशव शिंदे, पत्रकार रवींद्र खुडे, पत्रकार अरुणकुमार मोटे, पत्रकार सुभाष शेटे, परमेश्वर मचाले, रंजना दसगुडे, यशोदा दसगुडे, लीलाबाई दौंडकर, सुनंदा घावटे, शर्मिला निचित मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले. सूत्रसंचालन अर्जुन निचित सर यांनी केले. तर आभार पत्रकार तेजस फडके यांनी मानले.

